हेमांगी कवीची ‘चाळीशी’तील पोस्ट चर्चेत; म्हणते ‘खोटी वाटणारी गोष्ट खरी ठरली की राव’

मुंबई तक

• 01:53 PM • 27 Aug 2021

विविध विषयांवर मतं मांडणारी अभिनेत्री हेमांगी कवीच्या एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. वाढदिवसानिमित्ताने हेमांगी कवीने ही पोस्ट लिहिली असून, तिने या निमित्ताने तिच्या पंचविशीतील एका आठवणीली उजाळा दिला आहे. याचबरोबर हेमांगीने तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत. अभिनेत्री हेमांगी कवीचा २६ ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने हेमांगीच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या चाहत्यांचे आभार […]

Mumbaitak
follow google news

विविध विषयांवर मतं मांडणारी अभिनेत्री हेमांगी कवीच्या एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. वाढदिवसानिमित्ताने हेमांगी कवीने ही पोस्ट लिहिली असून, तिने या निमित्ताने तिच्या पंचविशीतील एका आठवणीली उजाळा दिला आहे. याचबरोबर हेमांगीने तिच्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

हे वाचलं का?

अभिनेत्री हेमांगी कवीचा २६ ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने हेमांगीच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या चाहत्यांचे आभार मानताना हेमांगीने तिच्या पंचविशीत ऐकलेला किस्साही सांगितला. त्यामुळे ‘चाळीशी’ पूर्ण केलेल्या हेमांगीची पोस्ट चर्चेत आली आहे.

हेमांगी काय म्हणाली?

हेमांगीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘तुमच्या शुभेच्छांसोबत, ‘चल, काही काय? ४०?’ ‘कुठल्या अँगलने ४०?’ ‘आईय्या अजूनही किती लहान दिसत्येस’ ’२१ वर्षांची असशील’ ‘एज इज जस्ट अ नंबर’ अरे यार, ४०? हीचं काय करायचं? ’१४ चं ४१ चुकून लिहिल असशील… बरोबर कर’ वगैरे वगैरे… हेच ऐकायची, वाचायची सुप्त इच्छा होती खरंतर काल; कारण चाळीशी झाली की बायकांना हे ऐकायचे खूपच वेध लागतात म्हणे, असं मी पंचविशीची असताना ऐकलेली आणि खोटी वाटणारी गोष्ट काल खरी ठरली की राव! ही ही ही…’

‘जोक अपार्ट पण काल तुमच्या सोशल मीडियावर आलेल्या गोड गोड कमेंट्स, टेक्स्ट, डीएम्स, फोन कॉल्समुळे, माझ्यावर लिहिलेल्या राईट अप्समुळे माझा वाढदिवस झकास झाला त्यासाठी प्रत्येकाला थँक यू थँक यू सो मच! ऐसे ही प्यार और आशीर्वाद बना रहे दोस्तों!’, असं हेमांगीने म्हटलं आहे.

‘बाई, बुब्स आणि ब्रा’वर मांडली होती सडेतोड भूमिका

काही दिवसांपूर्वी हेमांगी कवीने एका सार्वजनिक जीवनात बोलण्यास वर्ज्य मानल्या जाणाऱ्या “बाई, बुब्स आणि ब्रा”या विषयावर सडेतोड भूमिका मांडली होती. तिच्या या भूमिकेची बरीच चर्चा झाली होती. ‘ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या कम्फर्टेबल आहेत, त्यांनी ती जरुर घालावी, मिरवावी, काहीही! त्यांची निवड! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं का बघितलं जावं किंवा हे का लादलं जावं?’, असा प्रश्न हेमांगीने उपस्थित केला होता.

    follow whatsapp