‘हेम्या, तू शेण खायला…’, खासदार संजय जाधवांचं हेमंत पाटलांवर टीकास्त्र

मुंबई तक

04 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:04 PM)

MP Sanjay Jadhav Vs Mp Hemant Patil : राज्यात शिंदेंच्या बंडाळीनंतर भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. तसेच पक्षाच्या नावापासून चिन्हापर्यंत सर्व शिंदे गटाला (Shinde Group) मिळाले आहे. इतकं होऊन सुद्धा शिंदे गट आणि ठाकरे गट (Thackeray Group) नेत्यांमधील वाकयुद्ध शमलं नाही. याउलट ते आणखीणच तापलं आहे. या सर्वात आता ठाकरे गटाच्या खासदार […]

Mumbaitak
follow google news

MP Sanjay Jadhav Vs Mp Hemant Patil : राज्यात शिंदेंच्या बंडाळीनंतर भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. तसेच पक्षाच्या नावापासून चिन्हापर्यंत सर्व शिंदे गटाला (Shinde Group) मिळाले आहे. इतकं होऊन सुद्धा शिंदे गट आणि ठाकरे गट (Thackeray Group) नेत्यांमधील वाकयुद्ध शमलं नाही. याउलट ते आणखीणच तापलं आहे. या सर्वात आता ठाकरे गटाच्या खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Mp Hemant Patil) यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.(Hemya ​​you will go here and there to eat dung mp Sanjay Jadhav Single mention of mp Hemant Patil)

हे वाचलं का?

संजय जाधवांनी सांगितला गुवाहाटीचा किस्सा

राष्ट्रपतीची निवडणूक होती मतदाराच्या रांगेमध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Mp Hemant Patil) उभे होते. मी मतदान करून बाहेर आल्यानंतर ते सुद्धा बाहेर आले. त्यावेळी मी त्याला म्हटलं, ‘हेम्या पुन्हा इकडे तिकडे काही गडबड करशील, शेण खायला जाशील’. ‘सुदैवाने तू आमदार झालास, खासदार झालास, सासरवाडी ही चांगली आहे. एवढी मोठी बँक आहे संस्था आहेत. यावर हेमंत पाटीलने, नाय नाय मला साहेब आपल्याला कुठे जायचं नाही, असे सांगितले. आणि तासाभरानंतर तो टीव्हीवर बारा जनात दिसला, असे संजय जाधव (MP Sanjay Jadhav)यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील आमदार हिंगोलीत खासदार होतो, त्याने पक्षाशी बांधिलकी जपणे गरजेचे होते, असे देखील त्यांनी म्हटले.

हळदीचे युनिट मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना दिलं आता नाव घेत नव्या मुख्यमंत्र्याचं, असा टोला देखीज जाधव यांनी पाटलांना लगावला. तसेच हे नेमकं कुणाचा आहे यालाच याचं माहीत नाही, अशी खरमरीत टीका देखील केली.

‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी; विधानसभेला तर 200..’, संजय राऊतांचा दावा

पोलिसांना दिला इशारा

तुम्ही पोलीस प्रशासनात काम करताय तुम्ही जबाबदारीने काम कराव.आमच्या एखाद्या माणसाने गुन्हा केला तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी.आम्ही त्याला विरोध करणार नाही.मात्र तुम्ही सतेच्या मुजोरी पाई तुम्ही कोणाची गुलामगिरी करणार असाल तर आम्ही परभणीतुन येऊन हिंगोलीतील पोलिसांना तुमची जागा दाखवू, असाही इशारा त्यांनी दिला.

आम्ही परभणीत सत्ताधाऱ्याचं चालू देत नाही. अपराध केला तर तुम्हाला काय कलम लावायची ती लावा, पण केसला घाबरायच नाही. केसने काही वाकड होत नाही, असे देखील जाधव म्हणाले आहेत. तसेच कोणी अंगावर आलं तर त्याला कानाखाली काढू,ही ताकत ठेवणाराच शिवसैनिक असू शकतो.

ठाकरेंच्या ‘शिवगर्जने’ला भाजप-शिवसेनेचं यात्रेतूनच उत्तर, रणनीती ठरली!

उद्धव ठाकरेंचे हात बळकट करायचेत

सगळ्यांना वाटत मला काही मिळत का, आम्ही तीस वर्ष काम केली.आपल्याला उद्धव ठाकरेंचे हात बळकट करायचे आहेत, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. तसेच आम्हाला खूप ऑफर होत्या, पण आम्ही ते स्वीकारलं नाहीत, असे देखील जाधव (MP Sanjay Jadhav) म्हणाले आहेत.

    follow whatsapp