हिंगोली शहरात ३० डिसेंबरला बियाणी नगर भागात शस्त्राचा धाक दाखवत भर दिवसा चोरी करण्यात आली होती. या प्रकरणात सहबागी असलेल्या दोन्ही आरोपींना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तपासात पुढे आलेल्या बाबीनुसार हे दोन्ही आरोपी उच्चशिक्षित असून डॉन बनण्याच्या स्वप्नातून त्यांनी हा मार्ग निवडल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
गुन्ह्यातील दोन्ही आरोपी नचिकेत आणि चंद्रकांत हे परभणी येथे शिक्षण घेत होते. यातला एक पॉलिटेक्निक तर दुसरा इंजिनीअर पदव्युत्तर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चंद्रकांतने कुरिअर बॉय म्हणून कामाला सुरुवात केली. परंतू त्याचं स्वप्न काहीतरी वेगळंच होतं. बियाणी नगरात फिर्यादीच्या घरी पार्सल देण्यासाठी जात असताना घरात एकटी महिला व लहान मुलं असल्याचं पाहून त्याने लगेचच प्लान बनवला.
चोरीच्या आरोपाखाली केली होती अटक, एकाच दिवसात आरोपी पोलिसांच्या ताब्यातून झाला पसार
आपला मित्र नचिकेतच्या सहाय्याने त्याने घरात प्रवेश करत महिला व मुलांना बांधून तिच्याजवळचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल पळवला. चोरीच्या रकमेतून शस्त्र घेऊन आणखी मोठे गुन्हे करण्याचा त्यांचा प्लान होता. दुसरीकडे महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत कुरिअर बॉय म्हणून काम करणाऱ्या चंद्रकांतचा अटक केली. चंद्रकांतने गुन्ह्याची कबूली दिल्यानंतर, नचिकेत हा मध्य प्रदेशात पळून गेल्याचं सांगितलं.
यानंतर हिंगोली पोलिसांनी पथकं पाठवून नचिकेतलाही ताब्यात घेतलं आहे. आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्तुल, एक जिवंत काडतूस, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेलं वाहन असा साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अपघात झालेल्या कंटेनरमध्ये सापडला २२ लाखांचा गुटखा, इंदापूरातील घटना
ADVERTISEMENT