मुंबईत दिवसभरात 20 हजारांहून जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाने मुंबईचं टेन्शन वाढवलं आहे. तसंच ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचेही सर्वाधिक रूग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईसाठी नव्या गाईडलाईन्स आणण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये होम क्वारंटाईनचा कालावधी हा सात दिवसांचा करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
सहव्याधी असल्या तरीही ज्यांना कोरोनाची लक्षणं नाही तर किंवा अत्यंत सौम्य स्वरूपातली लक्षणं आहेत अशा कोव्हिड रूग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेता येणार आहेत. त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह आढळल्याच्या सातव्या दिवशी सलग तीन दिवस ताप नसेल तर या रूग्णांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपणार आहे. लसीकरण पूर्ण झालेली व्यक्ती कोव्हिड प्रतिबंधच नियम पाळून 24 तास रूग्णाची काळजी घेऊ शकणार आहे. यासंदर्भातली नियमावलीच आता मुंबई महापालिकेने आणली आहे.
मुंबई लोकल बंद होणार का? काय निर्बंध लागणार? राजेश टोपेंनी दिलं सविस्तर उत्तर, म्हणाले…
काय आहे नवी नियमावली?
रूग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान सात दिवस क्वारंटाईन करावं लागणार. सात दिवस पूर्ण होईपर्यंत शेवटचे तीन दिवस ताप न आल्यास क्वारंटाईन कालावधी संपणार आहे
शेवटच्या तीन दिवसात जर ताप आला तर मात्र क्वारंटाईनचा कालावधी वाढणार आहे.
क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतरही मास्क लावणं, कोव्हिड प्रतिबंधत्मक वर्तन पाळणं महत्त्वाचं असणार आहे
अति जोखमीच्या गटातील व्यक्तींचा कालावधीही सात दिवसांनी पूर्ण होणार आहे. मात्र या कालावधीत त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं आढळून आल्यास पाचव्या किंवा सातव्या दिवशी चाचणी करावी लागणार आहे.
तीन दिवस सलग 100 अंश किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा
श्वास घ्यायला त्रास होत असेल तरीही डॉक्टरांशी संपर्क साधा
ऑक्सिजनचं प्रमाण 93 टक्के किंवा कमी असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा
सतत छातीत दुखत असल्यास, रूग्णाचा मानसिक ताण किंवा थकवा जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा
रूग्णासाठीच्या सूचना
जो रूग्ण कोव्हिड पॉझिटिव्ह आहे त्याने स्वतःला होम क्वारंटाईन करायचं आहे. रूग्ण ज्या खोलीत राहणार आहे ती खोली इतर कुणी वापरू नये. ज्यांना ब्लड प्रेशर, मधुमेह, हृदयरोग किंवा इतर सहव्याधी आहेत त्यांची विशेष काळजी घ्या.
ज्या खोलीत रूग्ण होम आयसोलेशनमध्ये असणार आहे त्याची खोली हवा खेळती असणारी हवी. बंदिस्त खोलीत रूग्णाने स्वतःला बंद करून घेऊ नये.
रूग्णाने ट्रिपल लेअर मास्क वापरावा. आठ तासांनी मास्क बदलावा. जर आठ तासांच्या आत मास्क खोकल्यामुळे किंवा सर्दीमुळे ओला झाला तर तो तातडीने बदलावा. शक्यतो N95 मास्क वापरावा.
वापरलेला मास्क कापून कचरा कुंडीत टाकावा.
जो रूग्ण आहे त्याने स्वतःची काळजी घ्यावी. आंबट, थंड पदार्थ खाऊ नये.
रूग्णाने हात वारंवार धुवावेत, सॅनेटायझरचा वापर करावा.
रूग्णाने होम आयसोलेशनच्या काळात वापरलेल्या कुठल्याही वस्तू इतर कुणी वापरू नये याची विशेष काळजी घ्यायची आहे.
ज्या ठिकाणी म्हणजेच दरवाजे, खिडक्या, हँडल, बटणं या सगळ्यांना रूग्णांचा हात लागल्यानंतर ते वारंवार स्वच्छ केलं जावं.
मास्क वापरताना काय काळजी घ्याल?
रूग्णाने शक्यतो N95 मास्क वापरावा. त्याच्या सोबत त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तीनेही मास्क वापरावा
मास्क वापरताना त्याच्या समोरच्या भागाला रूग्णाने हात लावू नये
मास्क ओला झाला तर तो तातडीने बदलण्यात यावा
मास्क वापरून झाल्यानंतर मास्कची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावावी
ADVERTISEMENT