उत्तरकाशीत भीषण अपघात… 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, 17 जणांचा मृत्यू

मुंबई तक

• 04:12 PM • 05 Jun 2022

उत्तरकाशी: उत्तरकाशी येथे रविवारी (5 जून) एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. यमुनोत्रीला जाणारी एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील डामटाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये मध्य प्रदेशातील 40 प्रवासी होते. या अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. डीजीपी […]

Mumbaitak
follow google news

उत्तरकाशी: उत्तरकाशी येथे रविवारी (5 जून) एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. यमुनोत्रीला जाणारी एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील डामटाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये मध्य प्रदेशातील 40 प्रवासी होते. या अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तरीही पोलीस आणि एसडीआरएफची टीम बचावकार्यात गुंतलेली आहे.

डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, ‘बस मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातून उत्तरकाशीसाठी जात असताना हा अपघात घडला.’

अपघातानंतर घटनास्थळी एकच घबराट पसरली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित सर्व प्रवाशांना यमुनोत्रीला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘उत्तराखंडमधील बस दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. यामध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन घटनास्थळी सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले आहे.’

पंतप्रधानांनी जाहीर केली आर्थिक मदत

उत्तरकाशीमध्ये झालेल्या बस अपघातावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. यासोबतच अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात, 4 भारतीयांसह 22 जण होते विमानात

अमित शहा यांनी शोक व्यक्त केला

या अपघातानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘उत्तराखंडमध्ये भाविकांची बस दरीत कोसळल्याचे ऐकून खूप दुःख झाले. याबाबत मी मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. एनडीआरएफही लवकरच तेथे पोहोचणार आहे.’

अपघातानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ‘मी आणि माझी टीम उत्तराखंड सरकार आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. मृतदेह मध्यप्रदेशात आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. आम्ही सर्व शोकाकुल कुटुंबासोबत आहोत.’

    follow whatsapp