विरार भागातील एका खासगी बँकेत काम करणाऱ्या माजी ब्रँच मॅनेजरने आपल्याच बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपीने यावेळी ब्रँच मॅनेजरची हत्या केली असून या झटापटीत बँकेच्या महिला कॅशिअरही जखमी झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार २९ जुलैला संध्याकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान बँकेतला सर्व स्टाफ घरी परतला होता. बँकेच्या मॅनेजर योगिता वर्तक आणि कॅशिअर श्वेता देवरुख या शेवटी थांबून सर्व कामकाज आटोपून निघण्याच्या तयारीत होत्या. याचवेळी आरोपी माजी बँक मॅनेजर बँकेत आला. त्याला बँकेची खडानखडा माहिती असल्यामुळे त्याने आपला मोर्चा थेट बँकेच्या लॉकरच्या दिशेने वळवला.
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पोलिसांचा कारवाईत हलगर्जीपणाचा
आरोपी पैसे चोरण्याच्या उद्देशाने आल्याचं कळताच मॅनेजर योगिता वर्तक आणि कॅशिअर श्वेता देवरुख यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतू आरोपीने यावेळी चाकूने बँकेच्या मॅनेजर योगिता वर्तक यांच्यावर वार केले. या झटापटीत श्वेता यांनाही जखमा झाल्या. बँकेत चाललेला गोंधळ बाहेर लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आत येत आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
आरोपीने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या बँक मॅनेजर योगिता वर्तक यांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. माजी बँक मॅनेजरने हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे केला याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर होता. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT