राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिंदे सरकारच्या वैधतेला, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देण्यात आलं आहे. तसंच शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटीशींना आव्हान देण्याच्या याचिकेवर सुनावणी आहे. याचसोबत शिंदे आणि ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कुणाची? हे ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडत आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा युक्तीवाद केला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात?
गुवाहाटीमध्ये जाऊन आपणच मूळ पक्ष आहोत असा दावा बंडखोर आमदार कसा काय करू शकतात? निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षासंबंधी निर्णय घेतला जातो. गुवाहाटीमध्ये बसून तुम्ही हे जाहीर करू शकत नाही. आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा या गटाने केला आहे. पण दहाव्या सूचीत यासाठी मान्यता नाही. कोणतीही फूट पडणं हे दहाव्या सूचीचं उल्लंघन आहे. आजही उद्धव ठाकरे यांनाच पक्षाचा अध्यक्ष हा बंडखोर गट मानतो आहे. याचिकेत तसा उल्लेख असंही कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलं.
शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये राडा; शाखेतून काढलेले फोटो लावलेच!
आपल्या वर्तनातून सदस्य पक्ष सोडल्याचं सिद्ध करतात असं कर्नाटक विधानसभेच्या प्रकरणात कोर्टाने सांगितलं होतं. त्यांनी पक्षाच्या बैठकीला बोलवण्यात आलं असता ते सगळे जण सुरतला आणि गुवाहाटीला गेले. आपला पक्ष खरा असल्याचा दावा ते करू शकत नाहीत असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला.
जर तुम्ही राजकीय पक्ष आहात आणि दोन तृतीयांश आमदार फुटत असतील तर त्यांनी दुसऱ्या गटात सामील होणं किंवा नवा पक्ष स्थापन करणं गरजेचं आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
यावर न्यायमूर्तींनी त्यांना तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी भाजपमध्ये सामील व्हावं किंवा नवा पक्ष स्थापन करावा असं सांगायचं आहे का? अशी विचारणा केली. यावर कपिल सिब्बल यांनी हाच एक बचाव दिसत असल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT