How much tax will be levied on your income: नवी दिल्ली: लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) 2024 साली आहे. मात्र, आतापासूनच मध्यमवर्गीयांना आकर्षित करण्याची खेळी मोदी सरकारने (Modi Govt) खेळली आहे. अर्थसंकल्पातून (Budget 2023) प्राप्तिकरात (Income Tax) सूट मिळावी, अशी अपेक्षा आणि मागणी बहुतांश सामान्य माणसांना असते. यावेळी मोदी सरकारने बऱ्याच वर्षांनंतर अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे. (how much do you earn know How much tax will be levied on your income after new slab)
ADVERTISEMENT
खरं तर, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात नवीन आयकर स्लॅब आणला आहे. ज्यामध्ये बहुतेक मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार वार्षिक 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागणार नाही.
वैयक्तिक आयकराचा नवीन कर दर खालीलप्रमाणे आहे.
आता 0 ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कराची तरतूद आहे. 3 ते 6 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5%, 6 ते 9 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10%, 9 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15%, 12 ते 15 लाख आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 20% उत्पन्न मिळेल. 30% आयकर आकारला जाईल.
किती उत्पन्नावर किती कर द्यावा लागणार
-
उत्पन्न 7 लाखापर्यंत असल्यास – OLD Tax Regime नुसार 37,500 रुपये कर द्यावा लागेल. तर New Tax Regime नुसार सात लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे.
-
उत्पन्न 9 लाखापर्यंत असल्यास – OLD Tax Regime नुसार 60,000 रुपये कर द्यावा लागेल. तर New Tax Regime नुसार 45,000 रुपये कर द्यावा लागेल.
-
उत्पन्न 12 लाखापर्यंत असल्यास – OLD Tax Regime नुसार 1,14,500 रुपये कर द्यावा लागेल. तर New Tax Regime नुसार 90,000 रुपये कर द्यावा लागेल.
-
उत्पन्न 15 लाखापर्यंत असल्यास – OLD Tax Regime नुसार 1,87,500 रुपये कर द्यावा लागेल. तर New Tax Regime नुसार 1,50,000 रुपये कर द्यावा लागेल.
-
उत्पन्न 25 लाखापर्यंत असल्यास – OLD Tax Regime नुसार 4,87,500 रुपये कर द्यावा लागेल. तर New Tax Regime नुसार 4,50,000 रुपये कर द्यावा लागेल.
जुन्या टॅक्स स्लॅबचे आता काय होणार?
तज्ज्ञांच्या मते, नवीन कर प्रणालीवर इतर सुविधांची घोषणा करताना, सरकारने आपला हेतू स्पष्ट केला आहे. आता जुनी करत रचना (Old Tax Regime) हळूहळू रद्द केली जाईल. याचा अर्थ पुढील काही वर्षांत आयकर कायद्याच्या विविध कलमांतर्गत उपलब्ध करमुक्तीच्या तरतुदी मागे घेण्यात येतील.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आता नवीन कर प्रणाली स्वीकारणाऱ्यांना 15 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर केवळ 45,000 रुपये कर भरावा लागेल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, नवीन कर प्रणालीमध्ये, 15.5 लाख आणि त्यावरील करांसाठी 52,500 रुपयांपर्यंतचं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल.
वास्तविक, आतापर्यंत 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागत नव्हता. मात्र आता ही मर्यादा 7 लाख रुपये करण्यात आली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत, मूळ सूट मर्यादा आता 3 लाख रुपये करण्यात आली आहे. जी आधी अडीच लाख रुपये होती.
त्याचबरोबर 6 टॅक्स स्लॅब ऐवजी आता 5 टॅक्स स्लॅब असतील. नवीन कर प्रणालीमध्ये, 15.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 52,500 रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन करण्यात आलं आहे. जे आधी 50 हजार रुपये होते.
2023-24 च्या अर्थसंकल्पात सादर केलेला नवीन कर स्लॅब आहे-
-
0 ते 3 लाख 0 टक्के
-
3 ते 6 लाखांवर 5 टक्के
-
6 ते 9 लाखांवर 10 टक्के
-
9 ते 12 लाखांवर 15 टक्के
-
12 ते 15 लाखांवर 20 टक्के
-
15 लाखांपेक्षा जास्त रकमेवर 30 टक्क
याआधी 2020 मध्ये नवीन कर स्लॅब लागू करण्यात आला होता. ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला नाही.
आतापर्यंत जास्तीत जास्त लोकांनी जी कर रचना स्विकारली आहे तेच ओल्ड टॅक्स स्लॅब म्हणून ओळखलं जातं. यामध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कराची तरतूद आहे. मात्र, सरकार यावर 12,500 ची सूट दिली जाते. सोपे गणित असे आहे की, जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये तुम्हाला ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नव्हता.
जुना आयकर स्लॅब
-
2.5 लाखांपर्यंत – 0%
-
2.5 लाख ते 5 लाख – 5%
-
5 लाख ते 10 लाख – 20%
-
10 लाखाच्या वर – 30%
ADVERTISEMENT