धनत्रयोदशीच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित एक हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्याबद्दल आयकर विभागाने नोटीस काढली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यासह अजित पवार, पार्थ पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
जरंडेश्वर साखर कारखाने, दिल्लीतील फ्लॅट, पार्थ पवार यांचं निर्मल बिल्डिंग येथील कार्यालय, गोव्यातील रिसॉर्टसह जवळपास 1000 हजार कोटी बाजारमूल्य असलेल्या मालमत्ता जप्त करण्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे. यानंतर रात्री उशिरा अजित पवारांचे वकील अॅड. प्रशांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे.
अजित पवार यांच्याकडे संपत्ती आहे तरी किती हा प्रश्न यामुळे चर्चिला जातो आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक लढवताना अजित पवार यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यावरून याची माहिती मिळू शकते. मुंबई तकने ही माहिती आपल्या वाचकांसाठी आणली आहे.
2019 च्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केल्याप्रमाणे अजित पवार यांची मालमत्ता
जंगम मालमत्तेचा तपशील असा आहे
अजित पवार
हातातील रोख रक्कम- 111678
सुनेत्रा अजित पवार
हातातील रोख रक्कम-403384
हिंदू अविभिक्त कुटुंब-26966
एकूण- 5,42,28 रूपये
एफडी, मुदत ठेवी, वित्तीय संस्था सहकारी संस्थांमधील ठेवी
अजित पवार-7665259
सुनेत्रा पवार-31339757
हिंदू अविभक्त कुटुंब– 3375549
बंधपत्रे, ऋणपत्रे, शेअर्स-
अजित पवार-3144500
सुनेत्रा पवार -1293860
अविभक्त हिंदू कुटुंब -50000
राष्ट्रीय बचत योजना, विमापत्रं, गुंतवणुकीचा तपशील
अजित पवार- 4922062
सुनेत्रा पवार -4995869
अविभक्त हिंदू कुटुंब -निरंक
कोणतीही व्यक्ती, संस्था, न्यास यांना दिलेली कर्जाची रक्कम
अजित पवार- 2900000
सुनेत्रा पवार – 107473731
अविभक्त हिंदू कुटुंब – 1507506
जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेला अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
मोटार, वाहने, विहार नौका, जहाजं यांचा तपशील
अजित पवार– ट्रॅक्टर-2, ट्रेलर-4
होंडा एकॉर्ड कार- 6 लाख 75000
होंडा सीआरव्ही- 26 लाख 77 हजार 10
टोयोटा कँब्रे- 37 लाख 65 हजार 92
सर्व वाहनांची किंमत- 88 लाख 96 हजार 959
सुनेत्रा पवार- ट्रॅक्टर -1 , ट्रेलर-1, इनोव्हा क्रिस्टा- 20 लाख 77 हजार, 930
वाहनांची एकूण किंमत- 28 लाख 67 हजार 930 रूपये
जडजवाहिर, दागिने, मौल्यवान वस्तू, सोनं-चांदी यांचा तपशील
अजित पवार- चांदीच्या मूर्ती-किंमत- 8 लाख 30 हजार 210
चांदीच्या भेट वस्तू -किंमत- 5 लाख 60 हजार
अन्य कोणत्याही मत्ता, जसेकी हक्क-मागण्या- व्याज- 20 लाख 87 हजार 984
एकूण स्थूल मूल्य- 3 कोटी 11 लाख 18 हजार 652
सुनेत्रा पवार-
चांदीच्या भेटवस्तू- 14 लाख 30 हजार
चांदीची भांडी- 33 लाख 20 हजार
सोन्याचे दागिने- 14 लाख 6 हजार 144
इतर मत्ता, हक्क, मागण्या, व्याज यांचे मूल्य- 4 कोटी 92 लाख 42 हजार 49
एकूण स्थूल मूल्य- 20 कोटी 37 लाख 72 हजार 724
अजित पवार यांच्या उत्पन्नांचा स्रोत-शेती व्यवसाय
पत्नीच्या उत्पन्नाचा स्रोत-शेती व्यवसाय
अजित पवारांकडे असलेली जंगम मालमत्तेची एकूण रक्कम- 23 कोटी, 73 लाख 41 हजार 951 (2019 ला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार)
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या
स्थावर मालमत्तेची एकूण किंमत- 50 कोटी 93 लाख 13 हजार 656
अजित पवारांनी 2019 ला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण 74 कोटी 66 लाख 55 हजार 607 रूपयांची स्थावर आणि जंगम संपत्ती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच नाही-वकिलांचं स्पष्टीकरण
आयकर विभागाने अजित पवारांशी संबंधित कोणत्या मालमत्तेचा उल्लेख नोटीसमध्ये केला आहे आणि त्या मालमत्तेचा तपशील काय?
जरंडेश्वर सहकारी कारखाना. आयकर विभागाच्या माहितीनुसार याचं बाजारमूल्य 600 कोटी रुपये असून, हा कारखाना आधीच जप्त केलेला आहे. अजित पवारांशी संबंधित असलेला दक्षिण दिल्लीतील अंदाजे 20 कोटी रुपयांचा फ्लॅट. पार्थ पवार यांचं मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात असलेल्या निर्मल बिल्डिंगमधील कार्यालय. या कार्यालयाचे अंदाजे किंमत 25 कोटी रुपये आहे.
गोव्यातील निलय नावाचं रिसॉर्ट. या रिसॉर्टचं बाजारमूल्य जवळपास 250 कोटी रुपये असून, हे रिसॉर्ट अजित पवार यांच्याशी संबंधित आहे, असा दावा आयकर विभागाने केलेला आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध 27 ठिकाणचे भुखंड. या भुखंडांचं बाजारमूल्य अंदाजे 500 कोटी रुपये असल्याचं आयकरने म्हटलं आहे. आयकर विभागाच्या माहितीप्रमाणे तब्बल 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या मालमत्ता जप्त करण्याबद्दल नोटीस काढण्यात आली आहे.
अजित पवारांच्या वकिलांचं स्पष्टीकरण काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT