लतादीदींचा राहून गेलेला फोटो, शरद पवारांचा फोन आणि पुण्याची वारी; जाणून घ्या हा मजेशीर किस्सा

मुंबई तक

• 07:31 AM • 07 Feb 2022

– वसंत मोरे, बारामती प्रतिनिधी आपल्या मधुर आवाजाने लतादीदींनी संपूर्ण चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. प्रत्येक कार्यक्रमात लतादीदींचा फोटो काढता यावा यासाठी कित्येक फोटोग्राफरची अक्षरशः धावपळ सुरु असायची. भारतरत्न किताब मिळवलेल्या लतादीदी या स्वभावाने अत्यंत विनम्र आणि मृदू होत्या. एका कार्यक्रमात लतादीदींचा फोटो काढण्याची संधी बारामतीचे फोटोग्राफर शाम शिंदे यांना मिळाली होती. काय घडलं होतं तेव्हा […]

Mumbaitak
follow google news

– वसंत मोरे, बारामती प्रतिनिधी

हे वाचलं का?

आपल्या मधुर आवाजाने लतादीदींनी संपूर्ण चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. प्रत्येक कार्यक्रमात लतादीदींचा फोटो काढता यावा यासाठी कित्येक फोटोग्राफरची अक्षरशः धावपळ सुरु असायची. भारतरत्न किताब मिळवलेल्या लतादीदी या स्वभावाने अत्यंत विनम्र आणि मृदू होत्या. एका कार्यक्रमात लतादीदींचा फोटो काढण्याची संधी बारामतीचे फोटोग्राफर शाम शिंदे यांना मिळाली होती.

काय घडलं होतं तेव्हा बारामतीत?

२००१ मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खास निमंत्रणावरून गानसम्राज्ञी लतादीदी यांनी बारामतीला भेट दिली. त्यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभात लतादीदी सहभागी झाल्या होत्या. यावेळी शरद पवार यांनी लतादीदींना खास सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले होते. कार्यक्रमानंतर शरद पवारांनी ज्या वेळी पुन्हा विद्या प्रतिष्ठान संकुलाला भेट दिली.

लतादीदींचा फोटोच आला नाही, पवारांचा फोटोग्राफरला फोन –

कार्यक्रमानंतर शरद पवारांनी ज्या वेळी पुन्हा विद्या प्रतिष्ठान संकुलाला भेट दिली. त्यावेळी लतादीदींच्या कार्यक्रमाचे फोटो न्याहळत असताना त्यांना सन्मान चिन्हासह लतादीदींचा फोटोच दिसला नाही. कार्यक्रमाचे फोटो काढणारे छायाचित्रकार श्याम शिंदे यांना शरद पवार यांनी तात्काळ फोन लावून याबाबत विचारणा केली. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव लतादीदींना सन्मानचिन्ह देताना मला व्यासपीठावर पर्यंत पोहोचता आले नाही त्यामुळे दीदींचा सन्मान चिन्ह फोटो आला नसल्याची सबब शिंदे यांनी सांगितली.

पंधरा रुपये भाडं परवडत नसल्यामुळे बदलावी लागली खोली, लतादीदींचं कोल्हापूरशी होतं खास नातं

त्यावर शरद पवारांनी थेट लतादीदींना फोन लावून तुमच्याकडे एक छायाचित्रकार येतील त्यांना सन्मान चिन्हासह तुमचा फोटो काढायचा आहे, त्यावर संमती देत लतादीदींनी छायाचित्रकार पाठवून द्या असे सांगितले.

दुसऱ्याच दिवशी छायाचित्रकार श्याम शिंदे लतादीदींच्या पुण्यातल्या बंगल्यावर दाखल झाले. बंगल्यावर पोहोचताच लतादीदींनी शिंदे यांची आपुलकीने विचारपूस केली. पाहुणचार करताना काय घेणार..असे विचारले. त्यावर एवढ्या मोठ्या व्यक्तीने केलेल्या आदरातिथ्यामुळे शिंदे भारावून गेले होते. लतादीदींनी शिंदेना आदरातिथ्याने चहाची ऑफर केली. चहा येईपर्यंत लतादीदींनी शिंदे यांच्या व्यवसायाची चौकशी केली. शिंदे यांचे वडील बारामतीतले सर्वात जुने छायाचित्रकार होते. फोटोग्राफीचा त्यांचा जुना व्यवसाय याबाबत माहिती समजल्यानंतर लतादीदींनी शिंदे यांच्याकडे कुतुहलाने आस्थेने चौकशी केली.

अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाशी लतादीदींचं होतं खास नातं, स्वतः पोळ्या लाटून केली होती सेवा

एवढी जगविख्यात असलेली व्यक्ती आपल्यासोबत सोफ्यावर बसून चौकशी करत असल्याने या जाणिवेनेच भारावून गेले. लतादीदींशी त्यांचा प्रत्यक्ष भेटीचा क्षण आयुष्यात कधीच विसरता येणार नाही. फोटो काढण्याचा क्षण काही मिनिटांचा होता पण त्यांचा सहवास कायम स्मरणात राहील. लतादीदींच्या निधनामुळे समाजात भरुन न येणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी ‘मुंबई तक’ शी बोलताना व्यक्त केली.

अर्ध्यावरती डाव मोडला…’या’ कारणामुळे लतादीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहीत

    follow whatsapp