अजित पवार गर्दी करू नका सांगतात अन् तुम्ही…; जितेंद्र आव्हाडांवर नेटकरी संतापले

मुंबई तक

• 07:03 AM • 04 Sep 2021

राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेटकरी संतापल्याचं पाहायला मिळालं. आव्हाड यांनी भिंवडीतील त्यांच्या स्वागत यात्रेचा एक व्हिडीओ ट्वीट केला. ज्यात कोरोनाच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करण्यात आल्याचं दिसत असून, यावरून नेटकऱ्यांनी आव्हाडांना प्रश्न विचारत संताप व्यक्त केला आहे. राज्यावरील कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून अजूनही काही प्रमाणात निर्बंध ठेवण्यात […]

Mumbaitak
follow google news

राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेटकरी संतापल्याचं पाहायला मिळालं. आव्हाड यांनी भिंवडीतील त्यांच्या स्वागत यात्रेचा एक व्हिडीओ ट्वीट केला. ज्यात कोरोनाच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करण्यात आल्याचं दिसत असून, यावरून नेटकऱ्यांनी आव्हाडांना प्रश्न विचारत संताप व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

राज्यावरील कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून अजूनही काही प्रमाणात निर्बंध ठेवण्यात आले आहेत. तर दुसऱीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास कडक निर्बंध लावण्याचा इशाराही सरकारकडून दिला जात आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ लोकांनी संताप व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या स्वागताच एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ भिवंडीतील आहे. या व्हिडीओ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते दिसत आहे. मोटारसायकलीवरून कार्यकर्ते जात असल्याचं दिसत आहे.

महत्त्वाचं म्हणजे गर्दी टाळण्याचं आणि कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन सातत्याने सरकारकडून केलं जातं आहे. मात्र, राज्याच्या मंत्र्यांच्या स्वागतालाच झालेली गर्दी आणि कोविड नियमांचं करण्यात आलेलं उल्लंघन त्याचबरोबर वाहतूक नियमांचाभंगही करण्यात आल्यावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहे.

नेटकरी काय म्हणाले?

‘दहीहंडीला परवानगी द्या म्हणलो तर कोरोनाचं कारण देणार. गणपती उत्सवाला परवानगी नाकारली. मंदिरं उघडायला परवानगी नाही. उद्धव ठाकरे व अजित पवार १०-१५ सामान्य माणसं रस्त्यावर दिसली की लॉकडाऊनची धमकी देतात. आणि तुम्हाला तुमचा रुबाब झाडण्यासाठी गर्दी करतांना लाज नाही वाटत?’, अशा शब्दात एका नेटकऱ्यांने संताप व्यक्त केला आहे.

‘तुमच्या स्वागतात… इतक्या गर्दीत corona येत नसेल, तर मग मंदिरात, हिंदू सणांना, गणपती-दहीहंडीलाच corona डोकं वर काढतोय का साहेब? का तुम्हीच आमच्या हिंदू सणांना डोकं वर काढू देत नाहीत. जरातरी आदर्श लोखप्रतिनिधीसारखं वागा’, असं एका तरुणानं म्हटलं आहे.

‘काय साहेब, तुमच्या पक्षाचे नेते अजित पवार लोकांना लोकांना मोठ्या टिंब्या मारून सांगतात मास्क लावा, गर्दी करू नका आणि तुम्ही असं वागतात. सण आला तर फक्त तुम्हाला कोरोना आठवतो का? बाकीच्या वेळी कोरोना नसतो का?’, असा उलट सवाल एकाने उपस्थित केला आहे.

‘जितेंद्र आव्हाड साहेब, मानलं पाहिजे तुम्हाला. तुमच्या सरकारला सर्वसामान्य जनतेला सांगायचं गर्दी करू नका. कोरोना वाढत आहे. तिसरी लाट येणार आहे. मात्र नेतेमंडळी, मंत्रिमंडळ बिनधास्त रस्त्यावर गर्दी करत मोर्चे काढतात. त्यामुळे कोरोना कुठे जातो? सर्वसामान्य जनतेसाठी फक्त निर्बंध आहेत का? असंही एका नेटकऱ्याने विचारलं आहे. अशाच संतप्त प्रतिक्रिया या गर्दीवरुन उमटू लागल्या आहेत.

    follow whatsapp