उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू

सौरभ वक्तानिया

• 02:09 AM • 29 May 2021

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा ही घटना घडली आहे. उल्हासनगर येथील नेहरू चौक भागात असलेल्या साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

Mumbaitak
follow google news

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा ही घटना घडली आहे. उल्हासनगर येथील नेहरू चौक भागात असलेल्या साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण अडकले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी जाऊन दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना त्यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

हे वाचलं का?

उल्हासनगरच्या नेहरू चौक भागात साई शक्ती नावाची पाच मजली इमारत आहे. या इमारतीत एकूण 29 फ्लॅट्स आहेत. शुक्रवारी रात्री या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला. यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसंच NDRF ची एक टीमही घटनास्थळी दाखल झाली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मागच्या एका महिन्यात उल्हासनगरमध्ये झालेली ही तिसरी दुर्घटना आहे. गेल्या आठवड्यात उल्हासनगरच्या मोहिनी पॅलेस इमारतीमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती आणि पाच जणांचा मृत्यू झाला होता.

या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांची नावं

पुनीत बजोमल चांदवाणी

दिनेश बजोमल चांदवाणी

दीपक बजोमल चांदवाणी

मोहिनी बजोमल चांदवाणी

कृष्णा इनूचंद बजाज

अमृता इनूचंद बजाज

अशी नावं समोर आली आहेत. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये महिन्याभरात घडलेल्या या तिसऱ्या घटनेबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंता व्यक्त केली आहे. 1994-95 मध्ये बांधलेल्या काही धोकादायक इमारतींमधले स्लॅब पालिकेने कारवाई करून तोडले होते. मात्र विकासकाने हे स्लॅब वेल्डिंग करून जोडले. त्यामुळे या दुर्घटना होत असल्याचं कारणही समोर येतं आहे. अशा इमारती शोधून तातडीने त्या रिकाम्या करा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना दिले आहेत.

    follow whatsapp