ADVERTISEMENT
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर संपूर्ण युरोपात सध्या चिंतेचं वातावरण आहे. एकीकडे युक्रेनचं सरकार बलाढ्या रशियाचा सामना करत असताना जगभरातून युक्रेनला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येतो आहे.
अनेक युक्रेनचे नागरिक रशियाच्या हल्ल्यामुळे आपलं राहतं घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत आहेत. या लोकांच्या मदतीसाठी अन्नपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या पाठवल्या जात आहेत.
विमानांमधून ही मदत युक्रेनच्या सीमेलगत असलेल्या देशांमधून पाठवली जात आहे.
रशियाने केलेल्या आक्रमणाविरोधात सर्व युरोपियन आणि पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला पाठींबा दिला आहे.
आपलं राहतं घर सोडून जावं लागल्यामुळे युक्रेनियन नागरिकांवर सध्या मोठं संकट ओढावलं आहे.
अन्नपदार्थांचे डबे पाठवताना नागरिक
संपूर्ण जग युद्धाच्या विरोधात असताना रशियाची ताठर भूमिका पाहता या परिस्थितीवर तोडगा निघेल अशी चिन्ह सध्यातरी दिसत नाहीयेत.
अशा परिस्थितीत सहयोगी देशांनी केलेली मदत युक्रेनच्या नागरिकांसाठी बुडत्याला काडीचा आधार ठरणार आहे.
आपला शेजारी संकटात असताना त्याला मदतीला धावून जाणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य मानलं जातं.
रशिया-युक्रेन वादात हळुहळु युक्रेनला मिळत जाणारी मदत याचंच उदाहण आहे.
रशियाच्या हल्ल्यामुळे सध्या युक्रेनवर अस्मानी संकट कोसळलेलं आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातली चर्चेची पहिली फेरी निष्फळ गेली आहे. त्यातच रशियाने युक्रेनमधील काही शहरांवर हल्ला केल्यामुळे आगामी काळात हा संघर्ष वाढत जाण्याची शक्यता आहे.
युक्रेनच्या मदतकार्यात लहान मुलंही आपला खारीचा वाटा उचलत आहेत.
हे युद्ध लवकरात लवकर संपावं अशी प्रार्थना सध्या जगभरातून केली जात आहे. आणखी फोटो पाहण्यासाठी क्लिक करा
ADVERTISEMENT