पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे पतीने मटण कापायच्या सुरीने वार करत पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पत्नीने घराजवळील तलावात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू स्थानिकांनी वेळेत तलावात उडी मारुन या पतीला वाचवत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
ADVERTISEMENT
भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरातील मिलिंद नगर या भागात राहणारा आनंद वाघमारे याचे कामतघर परिसरात मटण विक्री चे दुकान असून त्याची पत्नी मीना ही सुद्धा त्यास त्याच्या व्यवसायात मदत करीत असे. मागील काही दिवसांपासून आनंद हा आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत असल्याने त्यांच्यात भांडण सुरू झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून हा वाद आणखीनच वाढायला लागला होता.
फेसबूकवरील मित्राच्या प्रेमात पडली विवाहीत महिला, लग्नाचं आमिष दाखवून आरोपीने केला बलात्कार
रविवारी संध्याकाळी पती-पत्नी घराकडे जात असताना वऱ्हाळ देवी मंदीर परिसरात दोघांचं जोरदार भांडण झालं. यानंतर आनंदने आपल्या पिशवीतील मटण कापायचा सुरा काढत पत्नीच्या मानेवर आणि पोटावर वार केले. यानंतर आनंदने तलावात उडी मारली. तलावात पती गटांगळ्या खात असल्याचं लक्षात येताच स्थानिक तरुणांनी उडी मारुन त्याला बाहेर काढलं.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पतीला अटक केली असून पत्नी मीनाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं कळतंय.
जेवण गरम करुन दिलं नाही म्हणून डॉक्टर वहिनीची दिराकडून गोळी झाडून हत्या
ADVERTISEMENT