राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. आर्यन खान जेवढे दिवस तुरुंगात होता तेवढ्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर किती वाढले याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही. गॅस दरवाढीमुळे मी दिवाळीमध्ये भाऊबीज म्हणून अजित पवार यांच्यासह इतर भावांकडे गॅस सिलेंडर मागणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी दिवाळीत केलेली ही टीका चर्चेचा विषय ठरते आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सिलिंडरचा भाव वाढला आहे. मी अजित पवारांना या दिवाळीत सांगणार आहे. आम्ही आठ बहिणींनी ठरवले आहे की आमच्या सहा भावांनी पुढच्या सहा महिन्यांसाठी आम्हाला प्रत्येकाने फक्त एक एक सिलिंडर द्यायचा. भाऊबीज पाहिजे का सिलिंडर पाहिजे मला सांगा’
आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये एकत्र बसून आम्ही फराळ करतो. प्रत्येकाला वेगवेगळे काम असते. करंजी बनवताना सर्वांकडे एक एक काम असते. यावेळी तिथे घरातील पुरुषांना प्रवेश नसतो. कारण फराळाच्या मध्ये अडथळा आणला की फराळ फसतो. या विभागामध्ये सर्वात कमी टॅलेन्टेड मी आहे. त्यामुळे थंड झालेली करंजी मोठ्या डब्यामध्ये ठेवण्याचे काम माझे असते. दिवाळी आणि दसऱ्यामध्ये जेवढा सिलेंडर आपल्याला लागतो तेवढा कधी लागत नाही. अशा काळात पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव वाढला आहे. सरकारला आर्यनला खानला आत ठेवून आणखी भाववाढ करायची होती काय असे मला वाटतं आहे. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
घरगुती गॅस सिलिंडरची किंमत लखनौमध्ये 937 रूपये झाली आहे. श्रीमंत असो किंवा गरीब आता कुणालाही सबसिडी मिळत नाही. ग्रामीण भागात गॅस पोहचवला, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत आम्ही चुलीच्या धुरापासून ग्रामीण महिलांची सुटका केली अशा घोषणा पंतप्रधानांनी अनेकदा दिल्या आहेत. मात्र आजही ग्रामीण भागात नैसर्गिक स्रोतच वापरण्यावर प्राधान्य आहे असं म्हणत समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह यांनीही मोदींवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT