31 मार्चपूर्वी ‘ही’ कामे उरकून घ्या, नाहीतर बसेल मोठा दंड

मुंबई तक

• 05:00 AM • 16 Mar 2023

Do these thing before 31 st march : येत्या 31 मार्च 2023 पुर्वी आर्थिक वर्ष (Financial Year) संपणार आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यापुर्वी नागरीकांना अनेक कामे करावी लागणार आहेत. यामध्ये आधार-पॅन लिंक (Aadhar-PAN), आयटीआर अपडेट,बचत योजनेत गुंतवणूक, मोठ्या प्रिमियमची एलआयची पॉलिसी या संबंधित कामे करणे आवश्यक आहे. जर ही कामे 31 मार्च पुर्वी न पुर्ण […]

Mumbaitak
follow google news

Do these thing before 31 st march : येत्या 31 मार्च 2023 पुर्वी आर्थिक वर्ष (Financial Year) संपणार आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यापुर्वी नागरीकांना अनेक कामे करावी लागणार आहेत. यामध्ये आधार-पॅन लिंक (Aadhar-PAN), आयटीआर अपडेट,बचत योजनेत गुंतवणूक, मोठ्या प्रिमियमची एलआयची पॉलिसी या संबंधित कामे करणे आवश्यक आहे. जर ही कामे 31 मार्च पुर्वी न पुर्ण झाल्यास आणि 1 एप्रिल उजाडल्यास तुम्हाला मोठा दंड बसणार आहे. तसेच अनेक सुविधांपासून तुम्ही वंचित राहणार आहात. त्यामुळे 31 मार्च पुर्वी ही उरलेली कामे करून घ्या असे आवाहन करण्यात येत आहे. (if you have itr lic policy ppf nps ssy account do these thing before 31 st march)

हे वाचलं का?

पॅन-आधार लिंक

पॅन कार्डशी आधार कार्ड (Aadhar-PAN) लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. जर या तारखेआधी पॅन कार्ड आधारशी लिंक झाले नाही तर आधार कार्ड डिअॅक्टीव्हेट होऊ शकते.31 मार्च 2023 पुर्वी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास त्याचे पॅन कार्ड निष्क्रीय होईल. दरवेळी पॅन-आधारशी लिंक करण्याची तारीख वाढवली जाते. मात्र यावेळेस ही तारीख वाढवली जाणार नाहीये,अशी माहिती इन्कम टॅक्स विभागाने दिली आहे. तसेच क्रेंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने 30 जूननंतर पॅनला आधारला लिंक न करणाऱ्यांना 1000 रूपये दंडनीय रक्कम ठेवली आहे.

आयटी रिर्टन

इनकम टॅक्स रिर्टन (Income Tax Return) फाईल करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. जर कोणत्याही करदात्याला ई-वेरीफिकेशनमध्ये नमुद केलेली तफावत योग्य वाटत असेल, तर ते त्यासाठी आयकर विभागाला उत्तर पाठवू शकता. यासोबतच करदाते आयटी रिटर्नही भरू शकतात.

सट्टेबाजांशी डीलचा प्लान, 1 कोटींची ऑफर, अमृता फडणवीसांनी सांगितलं सगळं प्रकरण

सेविंह स्किममध्ये गुंतवणूक

येत्या 12-13 दिवसात आर्थिक वर्ष संपणार आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यापुर्वी जर तुम्ही करदाते असाल आणि तुम्हाला टॅक्स वाचवायचा असेल तर आधीच सेविंग स्किममध्ये गुंतवणूक करण्याचे काम पुर्ण करून घ्या. इन्कम टॅक्सच्या 80 C अंतर्गत 1.50 लाखाच्या गुंतवणूकीवर सुट मिळते. सुकन्या समृद्धी योजना, सीनियर सिटीजन सेविंग स्किम, पब्लिक प्रोव्हिडंड फंड आणि नेशनस पेन्शन स्किममध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर कपातीचा लाभ घेऊ शकता. याशिवाय तुम्ही टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट स्किममध्येही गुंतवणूक करू शकता.

तुमच्या शरीरात ‘हे’ लक्षणे दिसल्यास तात्काळ दारू पिणे थांबवा

LIC पॉलिसी

जर तुम्ही मोठ्या प्रिमीयमच्या एलआयसी (LIC) पॉलिसीत कर कपातीचा लाभ घ्यायचा असेल तर 31 मार्चपूर्वी सदस्यता घेणे आवश्यक आहे. 31 मार्चनंतर यावर सुट मिळणार नाही आहे. 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नवीन आयकर नियमानुसार 5 लाखाच्या वार्षिक प्रिमियमपेक्षा अधिक आयुर्विमा पॉलिसीचे उत्पन्न करपात्र असेल. पण जर तुम्ही 31 मार्च 2023 पुर्वी 5 लाखाहून अधिक वार्षिक प्रिमीयमवाली पॉलिसी खरेदी करत असाल तर नवीन आयकर नियमात ती येत नाही.

आता आधार कार्डसंबंधी हे काम होईल मोफत; पण फक्त 14 जूनपर्यंत

दरम्यान आधार-पॅन लिंक, आयटीआर अपडेट,बचत योजनेत गुंतवणूक, मोठ्या प्रिमियमची एलआयची पॉलिसी या संबंधित कामे जर वेळेत पुर्ण केलात तर दंड टळणार आहे आणि मोठ्या नुकसानीपासून तुमचा बचाव होणार आहे.

    follow whatsapp