UPSC : IIT मुंबईचा विद्यार्थी शुभम कुमारने सांगितला ‘यूपीएससी’तील यशाचा मंत्र; विशेष मुलाखत

मुंबई तक

• 06:10 AM • 25 Sep 2021

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत मूळचा बिहारचा आणि आयआयटी मुंबईचा विद्यार्थी असलेल्या शुभम कुमारने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. शुक्रवारी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. शुभम कुमार सध्या पुण्यात प्रक्षिक्षण घेत असून, पंकज खेळकर यांनी शुभम कुमारसोबत संवाद साधला. प्रश्न – देशात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर कसं वाटतंय? प्रवास कसा होता? शुभम कुमार […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत मूळचा बिहारचा आणि आयआयटी मुंबईचा विद्यार्थी असलेल्या शुभम कुमारने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. शुक्रवारी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. शुभम कुमार सध्या पुण्यात प्रक्षिक्षण घेत असून, पंकज खेळकर यांनी शुभम कुमारसोबत संवाद साधला.

हे वाचलं का?

प्रश्न – देशात अव्वल क्रमांक पटकावल्यानंतर कसं वाटतंय? प्रवास कसा होता?

शुभम कुमार – खूप चांगलं वाटतंय. देशात पहिला येण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद वाटतोय. मी २०१८ पासून परीक्षेची तयारी सुरू केली होती. तयारी करत असताना अनेक चढउतार आले. पण मी स्वतःला नशीबवान समजतो की कुटुंबांचा खूप आधार मिळाला. त्याचबरोबर मला चांगले मित्र मिळाले, ज्यंनी मला सातत्यानं प्रोत्साहित केलं.

प्रश्न – कोरोना काळातील स्थिती कशी होती?

शुभम कुमार – कोरोना काळात खूप अडचणी आल्या. त्यावेळी मी दिल्लीत होतो. दोन-तीन मित्र होते. आम्ही सोबतच तयारी करत होतो. जेवणापासून सगळ्याच गोष्टींच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. पण, निर्धार होता की, तयारी करायचीच आहे आणि मन लावून अभ्यास करायचा आहे. याच काळात घराच्यांची खूप मदत झाली. या सर्व गोष्टींमुळे मला खात्री होती की, कठीण काळातही मी चांगल्या प्रकारे तयारी करु शकतो.

प्रश्न – तुम्ही पुण्याचे नाहीत, पण पुण्यात प्रशिक्षण घेत आहात, याविषयी काय सांगाल?

शुभम कुमार – पुण्यात येऊन चांगलं वाटतंय. मागील दोन-तीन महिन्यांपासून मी इथे आहे. परीक्षेची तयारी करण्यासाठी वातावरण चांगलं आहे. खूप चांगले मित्रही इथे मिळाले. खूप चांगला प्रवास राहिला.

प्रश्न – किती विद्यार्थी परीक्षा देतात?

शुभम कुमार – जवळपास दहा लाख विद्यार्थी पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरतात. त्यापैकी सहा ते सात लाख उमेदवार प्री परीक्षा देतात. त्यानंतर दहा हजार लोक मुख्य परीक्षा देतात. मग दोन ते तीन हजार लोक मुलाखती देतात.

प्रश्न – कुटुंबियांबद्दल काय सांगाल? त्यांनी कसा सपोर्ट केला?

शुभम कुमार – आमचं संयुक्त कुटुंब आहे. माझे आईवडिल, काका-काकू सगळे एकत्र राहतात. माझे वडील बँकेत मॅनेजर आहेत. काका डॉक्टर आहेत. आई आणि काकू गृहिणी आहेत. त्यामुळे घरून नेहमीच पाठिंबा मिळाला. दररोज बोलणं व्हायचं. माझी बहिणी अधिकारी आहे. मला प्रोत्साहित करण्यामध्ये दीदीचंही योगदान राहिलं. मला अडचणी येणार नाही, याबद्दल कुटुंबियांनी काळजी घेतली. घरातून इतका सपोर्ट केला जात असेल, तर तुम्हाला आणखी प्रेरणा मिळते.

प्रश्न – पहिल्यांदा यश मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा परीक्षा देण्याचं कारण काय?

शुभम कुमार – पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मला इंडियन डिफेन्स सेवेत संधी मिळाली. मी आनंदी होतो आणि आहे. पण, आयएएस सेवेत खूप वैविध्य आहे. आयएएस सेवेच्या माध्यमातून मी प्रत्यक्ष जमिनीवर राहून थेट लोकांसाठी काम करू शकतो. लोकांसाठी काम करू शकेल, असा विचार होता. तिच माझी दुसऱ्यांदा परीक्षा देण्यामागील प्रेरणा होती.

प्रश्न – पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा देणं किती अवघड होतं?

शुभम कुमार – मी आधी तयारी केली होती. त्याचा मला फायदा झाला. यावेळी मी जास्त तयारी केली होती. आधी मी जो अभ्यास केला होता, त्यामुळे माझी मूळ तयारी झाली. त्यानंतर वर्तमान पत्र आणि मासिकांच्या माध्यमातून मी माहिती भर टाकली.

प्रश्न – कोचिंग घ्यावी लागते का?

शुभम कुमार – मी कोचिंग घेतली होती. मी पहिल्या वर्षी दिल्लीत क्लासेस लावले होते. वेगवेगळ्या टप्प्यांवर टेस्ट सीरीज दिल्या.

प्रश्न – दिवसांतून किती तास अभ्यास करावा लागायचा?

शुभम कुमार – दिवसातून सात ते आठ तास मी अभ्यास करायचो. प्री परीक्षा दिल्यानंतर मी जास्त अभ्यास केला. आठ ते दहा तास अभ्यास करायचो. पण असं नाहीये की २४ तास अभ्यासच करायचा असतो.

    follow whatsapp