पटना: एका व्यक्तीने एका विवाहित महिलेल्या आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. महिलेच्या हट्टामुळे त्या व्यक्तीला महिलेसोबत अखेर मंदिरात लग्नही करावं लागलं. लग्नानंतर पत्नी बनलेल्या या महिलेने त्या व्यक्तीच्या घरी जाण्याचा हट्ट धरला तेव्हा तिच्या पतीने असं काही कृत्य केलं की, ज्याने सगळेच हादरुन गेले. जाणून घेऊयात नेमकी घटना काय आहे ते.
ADVERTISEMENT
अवैध संबंधांपासून सुरू होऊन लग्नापर्यंत पोहोचलेली ही गोष्ट पाटणा जिल्ह्यातील बुढनीचक गावची आहे. जिथे राहणाऱ्या नीरज नावाच्या तरुणाचे आपल्या शेजारीच राहणाऱ्या महिलेसोबत सूत जुळलं होतं. खरं तर ही महिला एकटीच राहायची. कारण तिचा पती हा नाशिकला राहत होता. त्यामुळे विवाहित महिला देखील नीरजच्या प्रेमात पडली होती. त्यामुळे नीरज देखील त्या महिलेच्या घरी तासनतास घालवायचा. यादरम्यान, दोघांनी एकत्र जीवन-मरणाच्या आणाभाका देखील घेतल्या.
नीरज देखील या विवाहित महिलेच्या प्रेमात अक्षरश: वेडा झाला होता. दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील प्रस्थापित झाले होते. महिलेच्या घरात नीरज अनेक दिवस येऊन राहायचा. त्यामुळे परिसरात दोघांविषयी उलटसुलट चर्चेला सुरूवात झाली होती. आपली आता बदनामी होत आहे हे पाहून नीरजने त्या विवाहित महिलेशी जवळच्याच एका मंदिरात लग्न केलं.
महिलेच्या बहिणीने सांगितले की, लग्नानंतर दोघेही एकत्र राहत होते. मात्र मंगळवारी रात्री उशिरा नीरजने बहिणीचा गळा आवळून खून केली.
मृत महिलेच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, आरोपी नीरजला याला माझ्या बहिणीला लिव्ह-इनमध्ये दुसऱ्या ठिकाणी ठेवायचे होते. तो तिला घरी घेऊन जायला तयार नव्हता. पण तिने नीरजच्या घरी जाण्याचा हट्ट धरला होता. यामुळेच संतापलेल्या नीरजने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. नीरजचे त्या महिलेवर जीवापाड प्रेम होतं. त्याच महिलेचा त्याने गळा दाबून खून केला.
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा, गळा चिरून केली हत्या
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी उपविभागीय रुग्णालयात पाठवला.
मृत महिलेच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या बहिणीचे वीस वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र तिचा नवरा नाशिकला राहत होता. पत्नी आणि नीरज यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती मिळताच त्याने पत्नीशी संबंध तोडले होते आणि तो वेगळा राहू लागला होता. या प्रकरणातील आरोपी नीरज हा हत्येच्या घटनेपासून फरार झाला आहे आणि सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT