मुंबई: कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt) यंदा दहावीची परीक्षा (SSC Exam) निर्णय करण्याचा मोठा निर्णय घेतला. यावेळी सरकारने असं स्पष्ट केलं की, अंतर्गत मूल्यमापनाच्या (Internal evaluation) आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (SSC Result) जाहीर केला जाणार आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, अंतर्गत मूल्यमापन म्हणजे काय, त्याचा नेमका फॉर्म्युला कसा असणार? या सारखे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. पण आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक चांगली आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.
यंदा दहावीचा निकाल हा जुलै महिन्यात जाहीर केला जाणार आहे. त्याआधी अतंर्गत मूल्यमापन होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता शिक्षण मंडळाने दहावी मूल्यमापनाचा फॉर्म्युला नेमका काय असणार आहे हे निश्चित केलं आहे.
Mahrashtra SSC exam Result 2021: मोठी घोषणा… दहावीचा निकाल जून २०२१ अखेर जाहीर करणार!
अशी असेल मूल्यमापनाची पद्धत जाहीर:
बुधवारी याबाबतचं स्वतंत्र वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केलं आहे. वेळापत्रकानुसार 10 जून ते 3 जुलै मूल्यमापनासाठी वेळ देण्यात आली आहे. त्याच दरम्यान दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षा रद्द झाल्यानंतर एक महिन्यांनी मूल्यमापन करण्याबाबत जीआर जाहीर केला होता. त्याच्या कार्यपद्धतीसाठी आता वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळा, शिक्षक मुख्याध्यापक यांच्यावरील जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक शाळेत 7 सदस्याची निकाल समिती गठीत केली जाणार आहे. ही समिती मंडळाच्या कार्यवाहीच्या वेळापत्रकानुसार कामकाजाची रुररेषा ठरवतील.तसेच यावेळी मुख्याध्यापकांवर महत्त्वाची जबाबादारी असणार आहे.
शाळा समितीकडून तयार केलेला निकाल संगणक प्रणालीमध्ये नोंदवण्याची आणि निकाल मंडळाला गोपनीय पद्धतीने देण्याती जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे.
SSC Exam : दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातली हायकोर्टातील याचिका मागे
नियमित विद्यार्थ्यांचा नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापन, तोंडी आणि प्रात्यक्षिक याचे अंतर्गत मूल्यमापन याचा आधार घेण्यात येणार आहे. ज्यांनी खासगी परीक्षा दिली आहे त्यांच्या पाचवी ते 9वी वर्गात प्राप्त झालेल्या गुणांचा आधार घेण्यात येणार आहे.
निकालाच्या कामाकाजात चुकीची माहिती दिल्यास शिक्षक आणि शाळांना जबाबादार धरण्यात येणार आहे. शाळांमधली समिती मूल्यांकनावर लक्ष ठेवणार असून त्यांच्या संमतीने हा निर्णय बोर्डाला पाठविण्यात येणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करताना गुण कसे दिले जाणार?
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर केला जाणार असला तरीही त्यासाठी शिक्षण खात्याने आता एक विशिष्ट प्रारुप ठरवून दिलं आहे. जाणून घ्या कशापद्धतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे.
2020-21 साठी इ. 10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषाद्वारे निश्चित करण्यात येईल.
1. विद्यार्थ्यांचे इ. 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
2. विद्यार्थ्यांचे इ. 10चे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण
ADVERTISEMENT