Jammu Airbase Blast : ड्रोनद्वारे जम्मू विमानतळं स्फोटकं टाकली, यंत्रणा हाय अलर्टवर

मुंबई तक

• 06:44 AM • 27 Jun 2021

भारतीय हवाई दलाच्या जम्मू येथील Air Station आज दोन कमी क्षमतेचे स्फोट झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारावर low-flying drones च्या माध्यमातून IED चा वापर करुन हे स्फोट करण्यात आले आहेत. ड्रोनचा वापर करुन देशात संरक्षण यंत्रणेच्या तळावर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे. हवाई दलाच्या पेट्रोलिंग टीमने ट्रोनमधून स्फोटकं टाकली जाताना पाहिल्याची माहिती […]

Mumbaitak
follow google news

भारतीय हवाई दलाच्या जम्मू येथील Air Station आज दोन कमी क्षमतेचे स्फोट झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारावर low-flying drones च्या माध्यमातून IED चा वापर करुन हे स्फोट करण्यात आले आहेत. ड्रोनचा वापर करुन देशात संरक्षण यंत्रणेच्या तळावर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे. हवाई दलाच्या पेट्रोलिंग टीमने ट्रोनमधून स्फोटकं टाकली जाताना पाहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे वाचलं का?

रविवारी मध्यरात्रीदरम्यान पाच मिनीटांच्या फरकाने हे दोन स्फोट झाले. भारतीय हवाई दलाने या वृत्ताला दुजोरा दिला असून या स्फोटांत हवाई दलाच्या कोणत्याही उपकरणांना धोका पोहचलेला नसल्याचं हवाई दलाने स्पष्ट केलंय.

या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ड्रोन हे हवाई दलाच्या रडारवर आले नाहीत. हवाई दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दल इंडिया टुडेशी बोलताना माहिती दिली. “IED टाकण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला असावा असा अंदाज आहे. या भागात हवाई दलाच्या विमानांवर हे आयईडी टाकण्याचा प्रयत्न होता. याआधीही सीमेपलीकडून काश्मीरमध्ये शस्त्र पाठवण्यासाठी ड्रोनचा वापर झाला होता.”

दरम्यान या घटनेची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली असून या भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या स्फोटानंतर Air Marshal विक्रम सिंग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूमध्ये जाणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही हवाई दलाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

    follow whatsapp