दादरमध्ये ट्रेनसमोर उडी मारणाऱ्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने जीव धोक्यात घालून वाचवलं

मुंबई तक

• 09:20 AM • 29 May 2021

मुंबईतल्या दादर येथे रेल्वे स्टेशन प्लॅट फॉर्मवर एका महिला आरोपीने लोकल येत असल्याचं पाहून उडी मारली. या महिलेला जीआरपी पोलीस कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून वाचवलं. दादर रेल्वे स्टेशनवरून या महिला आरोपीला पोलीस घेऊन जात होते. त्यावेळी या महिलेने ट्रेन प्लॅटफॉर्ममध्ये शिरत असल्याचं पाहिलं. त्यानंतर लगेचच तिने प्लॅटफॉर्मवरून रूळावर उडी मारली आणि तिथून पळून जाण्याचा […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या दादर येथे रेल्वे स्टेशन प्लॅट फॉर्मवर एका महिला आरोपीने लोकल येत असल्याचं पाहून उडी मारली. या महिलेला जीआरपी पोलीस कर्मचाऱ्याने आपला जीव धोक्यात घालून वाचवलं. दादर रेल्वे स्टेशनवरून या महिला आरोपीला पोलीस घेऊन जात होते. त्यावेळी या महिलेने ट्रेन प्लॅटफॉर्ममध्ये शिरत असल्याचं पाहिलं. त्यानंतर लगेचच तिने प्लॅटफॉर्मवरून रूळावर उडी मारली आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने अचानक उडी मारल्याने ती रूळावर पडली. तिच्या अंगावरून ट्रेनही गेली असती. मात्र त्याचवेळी अस्टिस्टंट पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी तत्परता दाखवली. त्यांनी तातडीने रूळावर उडी मारून या महिलेला वाचवलं. हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हे वाचलं का?
    follow whatsapp