महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 180 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 5 हजार 756 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 59 लाख 80 हजार 350 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.24 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज 9 हजार रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 180 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2.4 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 54 लाख 81 हजार 252 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 14 हजार 190 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 67 हजार 585 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 66 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 3 हजार 486 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 9 हजार नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 62 लाख 14 हजार 190 इतकी झाली आहे.
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या
मुंबई- 10 हजार 695
ठाणे- 15 हजार 824
पुणे – 16 हजार 414
सातारा- 7 हजार 312
कोल्हापूर- 11 हजार 144
सोलापूर- 4 हजार 134
अहमदनगर- 4 हजार 890
नागपूर- 2 हजार 329
महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमधील सक्रिय रूग्णांची संख्या लक्षात घेतली तर सक्रिय रूग्ण हे आजही पुणे आणि ठाण्यात जास्त आहेत. कोरोनाची दुसरी लाट ही फेब्रुवारीच्या मध्यात आली. ती आता ओसरत असली तरीही रूग्णसंख्या म्हणावी तशी रोज कमी होताना किंवा पहिल्या लाटेप्रमाणे अगदी कमी होताना दिसत नाहीये. यामुळेच तिसऱ्या लाटेचा धोकाही संभवतो आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात लेव्हल थ्रीचे निर्बंध आहेत. एवढंच नाही तर डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोकाही जाणवतो आहे त्यामुळे राज्यातले निर्बंध हळूहळू शिथील करण्यावरच सरकारचा भर आहे. मुंबईची लोकलसेवाही अद्याप सगळ्यांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी जे वर्तन आवश्यक आहे म्हणजे मास्क घालणे, अंतर पाळणे आणि हात स्वच्छ ठेवणे ते सगळ्यांनी करावं असं आवाहन प्रशासनाकडून रोज करण्यात येतं आहे.
ADVERTISEMENT