महाराष्ट्रात दिवसभरातल्या पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 62 हजार 919 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे तर 69 हजार 710 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 38 लाख 68 हजार 976 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 84. 6 टक्के इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा दर 80 टक्क्यांपर्यंत घसरला होता.
ADVERTISEMENT
CM Uddhav Thackeray: रेमडेसिवीरबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले!
आज दिवसभरात 828 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के इतका जाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण 2 कोटी 71 लाख 6 हजार 282 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 46 लाख 2 हजार 472 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41 लाख 93 हजार 686 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 26 हजार 462 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
Break The Chain चे निर्बंध लादल्याने कोरोना महाराष्ट्रात रूग्णसंख्या स्थिरावली-मुख्यमंत्री
आज दिवसभरात राज्यात 62 हजार 919 नवीन रूग्णांची नोंद झाली. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 46 लाख 2 हजार 472 इतकी झाली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या 828 मृत्यूंपैकी 422 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 167 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 239 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे 239 मृत्यू पुणे 114, औरंगाबाद 14, नागपूर 14, बुलढाणा 10, चंद्रपूर 10, ठाणे 10, यवतमाळ 9, नंदूरबार 7, नाशिक 7, सोलापूर 6 हिंगोली 5, जळगाव 5, जालना 5, सातारा 5, रायगड 4, सांगली 3, बीड 2, गडचिरोली 2, कोल्हापूर 1, नांदेड 1, उस्मानाबाद 1 आणि वाशिम 1 असे आहेत.
महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई – 65 हजार 670
ठाणे- 50 हजार 474
पालघर- 16 हजार 851
रायगड- 13 हजार 896
पुणे-1 लाख 6 हजार 19
सातारा-18 हजार 22
सांगली- 13 हजार 474
सोलापूर- 17 हजार 779
नाशिक-50 हजार 548
अहमदनगर- 20 हजार 427
जळगाव- 12 हजार 463
औरंगाबाद- 14 हजार 372
बीड- 12 हजार 150
लातूर- 13 हजार 440
परभणी- 10 हजार 753
नागपूर- 78 हजार 614
भंडारा-12 हजार 86
चंद्रपूर-27 हजार 203
महाराष्ट्रातील प्रमुख अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेतली तर लक्षात येतं की पुणे, नागपूर, मुंबई ठाणे आणि नाशिक या शहरांमध्ये अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या अजूनही जास्त आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत रूग्णसंख्या कमी होताना दिसते आहे मात्र इतर जिल्ह्यांमध्ये अद्याप स्थिती नाही.
ADVERTISEMENT