महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. राज्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यात जी बैठक झाली त्या बैठकीतही लॉकडाऊन लावण्याविषयीच चर्चा झाली. लॉकडाऊन लावला पाहिजे असंच मत डॉक्टरांच्या टास्क फोर्सनेही व्यक्त केलं आहे. राज्यात रूग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनाची साखळी मोडायची असेल तर लॉकडाऊन लावावाच लागेल. सोमवारी सकाळी 11 वाजता आणखी एक बैठक होईल त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. राज्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यात जी बैठक झाली त्या बैठकीतही लॉकडाऊन लावण्याविषयीच चर्चा झाली.
राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र
आणखी काय म्हणाले राजेश टोपे?
एक ते दोन दिवसांमध्ये विविध विभागांशी चर्चा केली जाईल. बुधवारी कॅबिनेटची बैठक बोलावली जाणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन हा मुख्य विषय असणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेतील. एवढंच नाही तर प्रत्येक जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजनचा प्लांट लावण्यासंदर्भातही सोमवारी बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर 11 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक होईल. राज्यात लॉकडाऊनची स्थिती निर्णमा झाली आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही. बुधवारी झालेल्या बैठकीनंतर याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने लॉकडाऊन अटळ
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा लागणार आहे ही बाब अपरिहार्य आहे. त्याच अनुषंगाने डॉक्टरांच्या टास्क फोर्ससोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मुख्य मुद्दा होता तो लॉकडाऊन संदर्भातला. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आणायची असेल तर 14 दिवसांचा कठोर लॉकडाऊन लावण्यात यावा अशी सूचना या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांनी मांडली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आठ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याच्या बाजूने होते.
आणखी काय काय घडलं बैठकीत?
आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत डॉ. प्रदीप व्यास, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. संजय ओक, डॉ. अविनाश सुपे, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित या सगळ्यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातली सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि काय उपाय योजता येतील यावर सगळ्यांनी आपली मतं मांडली. टास्क फोर्सने असं मत मांडलं होतं की महाराष्ट्रात 14 दिवसांचा लॉकडाऊन लावणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ८ दिवस लॉकडाऊन लावावा असं मत मांडलं. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन हा कठोरच असला पाहिजे यावर एकमत झालं.
टास्क फोर्सच्या तीन सदस्यांनी आठ दिवसांचा लॉकडाऊन लावावा असंही मत मांडलं. मात्र इतर सदस्य हे 14 दिवसांच्या लॉकडाऊनवर ठाम होते. कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर किमान 14 दिवस लॉकडाऊन लावावा लागेल असं मत या समितीने मांडलं.
एक रूग्ण हा किमान 25 जणांना बाधित करत आहे असंही डॉक्टरांच्या टास्क फोर्सने सांगितलं. या बैठकीत लसीकरणावरही चर्चा झाली. लसीकरणाचा उत्सव कसा साजरा करायचा हा प्रश्न आम्हाला विरोधकांना आणि केंद्र सरकारला विचारायचा आहे. वेळोवेळी लसीकरण वाढवत असताना सर्व गाईडलाईन्स देण्यात आल्या. जिथे रूग्ण वाढत आहेत तिथे लसीकरण करा अशी मागणी केली होती. 2 लाख लसी मुंबईत आली आहे. उत्तर प्रदेशात जर रूग्ण नाहीत तिकडे का लस का दिली जाते आहे यावरही चर्चा झाली. आमच्याकडे बेड आणि व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. मुंबईत जम्बो फॅसिलिटी उपलब्ध व्हावी यासाठी 4 सेंटरबाबतही चर्चा झाली.
ADVERTISEMENT