नाशिक: राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये आता निवडणुकांचे वेध लागले आहेत. अशातच आता सर्वच ठिकाणी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि पुणे या महानगरपालिकांप्रमाणेच आता सर्वच पक्षांनी नाशिक महानगरपालिकेवर देखील लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळेच आता इथे शिवसेनेने सत्ताधारी भाजपला खिंडार पाडलं आहे.
ADVERTISEMENT
नाशिकमधील भाजपचे तीन आणि एक अपक्ष नगरसेवक अशा एकूण पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जाता आहे.
लवकरच मुंबईसह नाशिक महापालिकेमध्ये देखील निवडणूक होणार आहे. अशावेळी आता भाजपमध्ये प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने देखील आपला खुंटा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळेच नाशिकचे भाजपचे नगरसेवक प्रथमेश वसंत गिते, हेमलता कांदेकर आणि जयश्री ताजणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर मुसीर सय्यद या अपक्ष नगरसेवकाने देखील शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.
याशिवाय भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष शंभू सुनील बागूल यांनीही भाजपला रामराम करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
पाहा कोणी-कोणी केला शिवसेनेत प्रवेश
नाशिक उपमहापौरांसह 4 भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला आहे. तसेच एका अपक्ष उमेदवाराने देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
-
भिकूबाई बागुल (उपमहापौर)
-
प्रथमेश वसंत गीते (भाजप नगरसेवक)
-
जयश्री कन्नु ताजने (भाजप नगरसेवक)
-
हेमलता कांडेकर (भाजप नगरसेवक)
-
मुसीर सय्यद (अपक्ष नगरसेवक)
या सर्वांचा पक्षप्रवेश हा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे पार पडला. यावेळी नाशिकमधील अनेक कार्यकर्ते देखील हजर होते.
ADVERTISEMENT