पंढरपूर: घर पेटवून देणारे चोरटे.. चोरीही केली अन् घराला आगही लावली!

मुंबई तक

• 12:43 PM • 31 Dec 2021

नितीन शिंदे, पंढरपूर: पंढरपूर शहरामध्ये चोरट्यांनी चोरी करून घरच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील सर्व लोक परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच जाताना चोरट्यांनी घराला आगही लावून दिल्याचं विचित्र प्रकार समोर आला आहे. यामुळे घरातील सुमारे दीड […]

Mumbaitak
follow google news

नितीन शिंदे, पंढरपूर: पंढरपूर शहरामध्ये चोरट्यांनी चोरी करून घरच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील सर्व लोक परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच जाताना चोरट्यांनी घराला आगही लावून दिल्याचं विचित्र प्रकार समोर आला आहे. यामुळे घरातील सुमारे दीड लाखांचे साहित्य जळून खाक झालं आहे.

हे वाचलं का?

पंढरपूर शहरानजीक इसबावी येथे पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अरुण जनार्दन घोडके यांचे इसबावी हद्दीत राहते घर आहे. घोडके कुटुंबीय घराला कुलूप लावून पुणे येथे गेले होते. पण बुधवारी मध्यरात्रीनंतर त्यांच्या घराला अचानक आग लागल्याचे दिसून आले.

गुरुवारी पहाटेपर्यंत ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या दरम्यान दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील रोख 10 हजार रुपये तसेच अडीच तोळे सोन्याचे लॉकेट, अर्धा तोळे सोन्याचे कानातील टॉप्स असे एकूण 1 लाख 15 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याचं यावेळी उघड झालं आहे.

घरात अचानक लागलेल्या आगीमध्ये कागदपत्रे, कपडे लाईट वायरिंग व इतर साहित्य जळून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद अरुण घोडके यांनी शहर पोलिसांत दाखल केली आहे.

शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण पाहणी केली आहे. मात्र, घराला लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, चोरी केल्यानंतर चोरट्यांनीच ही लाग लावली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आता पुढील संपूर्ण घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.

पुणे: विमानाने पुण्यात यायचे अन् चोरी करायचे, श्रीमंत चोरटे कसे सापडले पोलिसांच्या जाळ्यात?

अशा पद्धतीने चोरट्यांनी चोरी करुन घरच पेटवून दिल्याने सध्या संपूर्ण परिसरात भीती व्यक्त केली जात. ज्या पद्धतीने चोरट्यांनी घर पेटवून दिलं त्यावरुन स्थानिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे या निष्ठूर चोरट्यांना तात्काळ अटक करुन त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत देखील आता स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर चोरट्यांना जेरबंद करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.

    follow whatsapp