Pimpri-Chinchwad: छोट्याशा संशयातून भर रस्त्यात युवकाची हत्या, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

मुंबई तक

• 05:59 PM • 12 Jul 2021

समीर शेख, पिंपरी-चिंचवड पुणेलगतच्या (Pune) पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील चिखली साने कॉलनी येथे भर दिवसा धारदार शस्त्राच्या सहाय्याने एका युवकाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर चिखली पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आणखी एका अल्पवयीन आरोपीला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण हत्येचा थरार हा नजीकच्या CCTV कॅमेरामध्ये कैद झाल्याने […]

Mumbaitak
follow google news

समीर शेख, पिंपरी-चिंचवड

हे वाचलं का?

पुणेलगतच्या (Pune) पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील चिखली साने कॉलनी येथे भर दिवसा धारदार शस्त्राच्या सहाय्याने एका युवकाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर चिखली पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आणखी एका अल्पवयीन आरोपीला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या संपूर्ण हत्येचा थरार हा नजीकच्या CCTV कॅमेरामध्ये कैद झाल्याने पोलिसांनी त्याच आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या विषयी चिखली पोलिसांनी अशी माहिती देण्यात आली आहे की, मयत इसमाचे नाव कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर असे आहे. तर त्याची हत्या करणाऱ्या आकाश उर्फ ​​मकसूद विजय जाधव या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे.

आता पोलिसांनी या हत्येप्रकरणी अत्यंत धक्कादायक अशी माहिती दिली आहे. एका साध्या संशयातून हे प्रकरण घडलं असल्याचं आता समोर आलं आहे. मृतक कानिफनाथ आणि हल्लेखोर आकाश हे पूर्वी एकमेकांच्या शेजारीच राहत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्री देखील होती.

परंतु काही दिवसांपूर्वी त्या भागातील काही तरुणांनी आकाशला काही कारणास्तव निर्दयपणे बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमागे कानिफनाथ याचाच हात असल्याचा संशय आकाशला होता.

दरम्यान, मारहाणीची घटना घडल्याने आकाश हा आपल्या कुटुंबीयांसह दुसर्‍या ठिकाणी राहायला गेला होता. परंतु आपल्याला झालेल्या मारहाणीचा बदला घ्यायचाच ही एकच गोष्ट आकाशच्या मनात होती. याच रागातून आकाशने अतिशय थंड डोक्याने कानिफनाथ याची हत्या केली.

रविवारी दुपारी कानिफनाथ हा रस्त्यावर आपल्या एका मित्राशी बोलत उभा होता. त्याचवेळी आकाश हा तिथे शांतपणे दाखल झाला. यावेळी त्याने आपल्यासोबत आणलेल्या एका पिशवीतून अत्यंत धारदार हत्यार बाहेर काढले आणि बेसावधपणे उभ्या असलेल्या कानिफनाथवर असंख्य वार केले.

यावेळी जखमी झालेला कानिफनाथ हा आपले प्राण वाचवण्यासाठी वाट सुटेल तिथे पळत होता. परंतु आकाशनेही पाठलाग करुन त्याला गाठलं आणि अत्यंत निर्दयपणे त्याच्यावर हल्ला चढवत भर रस्त्यात निर्घृणपणे त्याची हत्या केली.

Pune Murder: कामावरून घरी जाताना PMPML चालकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

शेवटी कानिफनाथ हा रस्त्यावर जखमी अवस्थेत कोसळला तेव्हा आकाशने त्याच्या डोक्यावर मोठा दगड मारून कानिफनाथ याला जागीच ठार मारले. दरम्यान, आता या संपूर्ण घटनेचे सर्व सीसीटीव्हीचे फुटेज समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी नेमकं हेच एक कारण होतं की आणखीही काही कारण आहे याचा देखील पोलीस आता तपास करत आहेत.

    follow whatsapp