धनंजय साबळे, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
अकोला: राहूल गांधींनीच काँग्रेसचं अध्यक्ष व्हावं ही काँग्रेसजनांची इच्छा आहे. सध्याच्या परिस्थितीत देशाला बाहेर काढण्याचं सामर्थ्य फक्त गांधी परिवारातच असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. ते अकोल्यात बोलत होतेय. आपल्याला अध्यक्षपदाची ऑफर असल्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले स्पष्टोक्ती देतांना बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला आहे.
नाना पटोले राहूल गांधींच्या टी शर्ट ट्रोलींगवरती काय म्हणाले?
”राहूल गांधींच्या टी शर्टपेक्षा भाजपनं महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावं. सत्तेमध्ये येताना दिलेली वचनं न पाळता शेतकऱ्यांना लुटण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. मुठभर मित्रांना फायदा देण्यासाठी केंद्राचं काम सुरु आहे. देश विकणाऱ्यांना राहूल गांधींवर टीका करण्याचा अधिकार नाही” असं नाना पटोले म्हणाले आहेत. केंद्रानं तपासयंत्रणाचं दुरूपयोग केला. भाजप सत्तापिपासू असल्याचं लोकांच्या लक्षात येत आहे असंही नाना म्हणाले.
नाना पटोले मंत्रीमंडळ विस्तारावरती काय म्हणाले?
मंत्रिमंडळ विस्तारावरुन देखील नाना पटोलेंनी राज्य सरकारवरती टीका केली आहे. उपमुख्यमंत्री पद हे संविधानीक नाही, तेही बिन खात्याचे उमेदवार आहेत. आतापर्यत पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात 18 मंत्री करण्यात आले. दुसरा मंत्रीमंडळ विस्तार न करण्यामागे सरकार पडेल ही भिती आहे. जनतेचं नुकसान झालं तरी चालेल. सत्तेमध्ये बसून राज्य कसं विकता येईल, याच्यावरच राज्य सरकार काम करत आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार करायचा नाही. जिल्ह्याला पालकमंत्री द्यायचा नाही, ही लाईन भाजपने घेतली आहे असं नाना पटोले म्हणाले आहेत.
महागाईवरुन नाना पटोलेंचा भाजपला टोला
महागाईच्या मुद्द्यावरुन देखील नाना पटोलेंनी भाजपवरती टीका केली आहे. ते म्हणाले “महागाईच्या विषयावर हे सरकार बोलायला सुद्धा तयार नाही. मात्र मलाई खाण्यासाठी ज्या पद्धतीने राज्याची बदनामी करण्यासाठी, गुहावटीमध्ये जे काही महाराष्ट्राची बदनामी झाली. महाराष्ट्राच्या राजकारणाची जनतेची झाली, त्याची यांना चिंता नाहीये. फक्त राज्य विकण्यासाठी आणि राज्यातील जनतेच्या घामाचा पैसा खाण्यासाठी हे सरकार काम करत आहे.”
ADVERTISEMENT