अमरावतीत दिवसभरात 7 जणांचा मृत्यू, अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा किती?

मुंबई तक

• 04:55 PM • 04 Mar 2021

अमरावती: अमरावतीत दिवसभरात 352 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत अमरावतीच्या रुग्णसंख्येत काहिशी घट झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, आज अमरावतीमध्ये 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे 669 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रातील आतापर्यत 7693 जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. त्यापैकी आज 151 जणांना […]

Mumbaitak
follow google news

अमरावती: अमरावतीत दिवसभरात 352 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत अमरावतीच्या रुग्णसंख्येत काहिशी घट झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, आज अमरावतीमध्ये 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे 669 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

दरम्यान महापालिका क्षेत्रातील आतापर्यत 7693 जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. त्यापैकी आज 151 जणांना होम क्वॉरंटाइन ठेवलं आहे. तर ग्रामीण भागात आतापर्यंत 3846 जणांना होम क्वॉरंटाइन केलं आहे. सध्या अमरावतीमध्ये 6449 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच रिकव्हरी रेट 82.45 टक्के एवढा आहे.

8 मार्च 2021 (कोरोना रुग्णसंख्या अपडेट)

अमरावतीमध्ये आज दिवसभरात तब्बल 448 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आज अमरावतीमध्ये 7 कोरोना रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. दुसरीकडे 853 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान महापालिका क्षेत्रातील आतापर्यत 7829 जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. त्यापैकी आज 136 जणांना होम क्वॉरंटाइन ठेवलं आहे. तर ग्रामीण भागात आतापर्यंत 3930 जणांना होम क्वॉरंटाइन केलं आहे. सध्या अमरावतीमध्ये 5319 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच रिकव्हरी रेट 83.99 टक्के एवढा आहे.

7 मार्च 2021 (कोरोना रुग्णसंख्या अपडेट)

अमरावतीमध्ये अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाहीए. कारण गेल्या 24 तासात अमरावतीत तब्बल 595 रुग्ण सापडले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अमरावतीकरांच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे आज 744 कोरोना बाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान महापालिका क्षेत्रातील आतापर्यत 7542 जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. त्यापैकी आज 248 जणांना होम क्वॉरंटाइन ठेवलं आहे. तर ग्रामीण भागात आतापर्यंत 3721 जणांना होम क्वॉरंटाइन केलं आहे. सध्या अमरावतीमध्ये 6663 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच रिकव्हरी रेट 81.72 टक्के एवढा आहे.

Corona virus : नागपुरात आता १४ मार्चपर्यंत कडक निर्बंध

4 मार्च 2021 (कोरोना रुग्णसंख्या अपडेट)

अमरावती जिल्ह्यात अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाहीए. कोरोना अटोक्यात यावा यासाठी लॉकडाऊन देखील अमरावतीत जाहीर करण्यात आला आहे. मात्र, असं असताना गेल्या 24 तासात अमरावतीत 690 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमरावतीत आतापर्यंत 39242 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 520 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 33460 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या अमरावतीत कोरोनाचे 5260 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

अमरावती मार्केट उघडण्यास परवानगी

दरम्यान, असं असताना अमरावती मार्केट उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तशा स्वरुपाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. उद्यापासून (६ मार्च) सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते ४ खुली राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा पूर्णपणे; इतर कार्यालयाच्या सेवा किमान १५ व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू असतील. सुरक्षित अंतर, मास्क, स्वच्छता न आढळल्यास दुकान पाच दिवस होणार सील व आठ हजार रूपये दंड असणार आहे. तसेच आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.

लॉजिंग सेवा २५ टक्के क्षमतेत सुरू राहील. ग्राहकाला रुममध्ये सीलबंद जेवण सेवा, नियमभंग झाल्यास १५ हजार दंड ठोठावण्यात येणार आहे. उपाहारगृहे, हॉटेलला केवळ पार्सल देण्याची परवानगी असणार आहे. वीकेंड लॉकडाऊन तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. मात्र गरज पडल्यास पुन्हा लागू केला जाऊ शकतो अशीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

4 मार्च 2021 (कोरोना रुग्णसंख्या अपडेट)

अमरावतीत लॉकडाऊन लागू करुन आता आठवडा उलटला आहे. मात्र, अद्यापही येथील कोरोना बाधितांची म्हणावी तेवढी संख्या कमी झालेली नाही. गेल्या 24 तासात अमरावतीमध्ये तब्बल 618 रुग्ण सापडले आहेत. तर अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमरावतीच्या प्रशासनाची चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत राहिल्यास नेमकं काय करायचं हा प्रश्न आता प्रशासनाला सतावत आहे.

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 38552 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी 512 जणांचा मृत्यू झाला असून सध्या अॅक्टिव्ह रुग्ण 5511 एवढे आहेत. अशी परिस्थिती असताना अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसत नाही. (in the last 24 hours 618 new corona patients have been detected in amravati)

अमरावती महानगरपालिकेतील 80 अधिकारी, कर्मचारी कोरोना संक्रमित

दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात शासकीय कार्यालयात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पाठोपाठ अमरावती शहराचं आरोग्य व स्वच्छता सांभाळणाऱ्या अमरावती महापालिकेतील 80 कर्मचारी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले आहे. कोरोना बाधितांमध्ये झोन क्रमांक 1, 2 ,3 चे सहायक आयुक्त, शहर अभियंता, सिस्टीम मॅनेजर, विधी अधिकारी, डेप्युटी इंजिनिअर, डॉक्टर, लिपिक आदींचा समावेश आहे. यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण देखील वाढला आहे.

अमरावती: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात कडक निर्बंध लागू

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ पाहता केंद्र सरकारच्या पथकाने दोनच दिवसांपू्र्वी अमरावती शहराला भेट दिली. अमरावती शहरात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढीस का लागले याची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून सहसचिव निपुण विनायक, एनसीडीसीचे उप संचालक डॉ. संकेत कुलकर्णी, तज्ज्ञ डॉ. आशिष रंजन यांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. या टीममधील निपुण विनायक यांनी अमरावती शहराला भेट दिली.

वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी गर्दी टाळणं आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक भागांमध्ये गर्दी कशी कमी करता येईल याची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्रीय पथकाने दिले आहेत. ज्या भागांमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे तिकडे कंटेन्मेंट झोन जाहीर करुन घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन तपासणी करावी असे निर्देश केंद्रीय पथकाने दिले आहेत. या दौऱ्यात विनायक निपुण यांनी शहरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट दिली कोरोनाग्रस्त रुग्णांसाठीच्या सोयीसुविधांचा आढावा देखील घेतला.

    follow whatsapp