सातारा: सातारा जिल्ह्यातील वाई पालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्यावर राज्य शासनाने अपत्रातेची कारवाई केली आहे. सन 2017 मध्ये ठेकेदाराकडून लाच घेताना नगराध्यक्षा आणि त्यांच्या पतीला अटक झाली होती. त्यानंतर वेळोवेळी याबाबत सुनावणी झाली. त्यातून शासनाने नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे यांना पदावरुन बाजूला केल्याचा निर्णय दिला.
ADVERTISEMENT
नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी भारतीय जनता पक्षातून थेट नगराध्यक्षपदासाठीची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्या आश्चर्यकारकरित्या निवडून देखील आल्या होत्या. त्यांच्या या विजयानंतर वाईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला मोठा धक्का बसला होता. मात्र, आता त्यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
डॉ. प्रतिभा शिंदे यांनी एका कामाच्या मोबदल्यात ठेकेदाराकडे 14 हजार रुपयांची लाच मगितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याच प्रकरणी त्यांना अटक देखील झाली होती. अटकेनंतर त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन देखील मिळवला होता.
दरम्यानच्या काळात पालिकेतील नगरसेवकांनी त्यांना पदावरुन बाजूला करा अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार दोन वेळा सुनावणी देखील झाली. शासनाने डॉ. शिंदे यांना नगराध्यक्षपदावरुन हटविण्याचा निर्णय दिला.
भाजप नेते Ashish Shelar यांची सरकारवर जोरदार टीका
या निर्णयाने सातारा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, डॉ. प्रतिभा शिंदे यांना या पुढे सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. असेही शासनाने दिलेल्या निर्णयात नमूद केले आहे.
दरम्यान, आता शासनाने दिलेल्या या निर्णयानंतर डॉ. प्रतिभा शिंदे आणि भाजप नेमकं याला आव्हान देणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच वाईमधील या राजकीय घडामोडीचे राज्यातील राजकारण काही पडसाद उमटणार का? यावर देखील आता अनेकांचं लक्ष आहे.
ADVERTISEMENT