ADVERTISEMENT
देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत वाढ होत असताना काही राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे.
कोरोनाच्या चाचण्यांवर भर देऊन बाधितांवर वेळेत उपचार करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.
मुंबईच्या वांद्रे टर्मिनन्स येथे बाहेरील राज्यांतून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे.
कोरोना चाचण्यांमुळे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते असं मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्रासोबतच केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रत्येक दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी करण्यासाठी अशाप्रकारे जय्यत तयारी केली आहे.
दुसऱ्या ला्टेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत कोविडमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अद्याप नियंत्रणात आहे.
मुंबई महापालिकेने बुधवारी हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोरोना महामारीची शहरातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे.
बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची मुंबईतल्या रेल्वे स्थानकात नोंद करुन त्यांची चाचणी केली जात आहे.
गेल्या तीन आठवड्यांमध्ये राज्यात ३१४ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला.
यापैकी ४५ टक्के मृत्यू हे ६० ते ८० या वयोगटातील असल्याचं आकडेवारीतून समोर येतंय.
त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घालून सोशल डिस्टन्सिंग व इतर सरकारी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन सरकारी यंत्रणा वारंवार करत आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येला ओहोटी लागलेली असून गेल्या २४ तासांत १२ रुग्णांचा मृत्यू झालेला असल्यामुळे नागरिकांनी कुठेही शिथीलपणे वागू नये असं आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून केलं जातंय.
ADVERTISEMENT