टीम इंडियाचे Assistant Physio योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह, अखेरच्या कसोटीवर प्रश्नचिन्ह

मुंबई तक

• 12:13 PM • 09 Sep 2021

टीम इंडियाचे assistant physio योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. टीमचे हेड रवी शास्त्री यांना कोरोना झाला आहे. त्याचप्रमाणे सपोर्ट स्टाफमधल्या तिघांनीही कोरोना झाला आहे. अशात आता योगेश परमार यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. योगेश परमार हे टीम इंडियाचे assistant physio आहेत. त्यांच्या आधी फिजिओ नितीन […]

Mumbaitak
follow google news

टीम इंडियाचे assistant physio योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. टीमचे हेड रवी शास्त्री यांना कोरोना झाला आहे. त्याचप्रमाणे सपोर्ट स्टाफमधल्या तिघांनीही कोरोना झाला आहे. अशात आता योगेश परमार यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.

हे वाचलं का?

योगेश परमार हे टीम इंडियाचे assistant physio आहेत. त्यांच्या आधी फिजिओ नितीन पटेल यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे आता टीम इंडियाला इंग्लंडच्या physio ची मदत घ्यावी लागणार आहे. ईएसपीएनक्रिकइंफोने दिलेल्या माहितीनुसार भारतीय टीमच्या सदस्यांना आपल्या हॉटेलच्या रूममध्ये राहण्यास सांगितलं आहे. बुधवारी झालेल्या टेस्टमध्ये हा रिपोर्ट आला आहे.

रवि शास्त्री, बॉलिंग कोच भरत अरूण फिजिओ नितीन पटेल आणि आर श्रीधर यांचेही कोरोना रिपोर्ट प़ॉझिटिव्ह आले आहेत. आता टीम इंडियाच्या स्टाफपैकी पाचवे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

रवी शास्त्रींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व खेळाडूंची शनिवारी आणि रविवारी lateral flow test घेण्यात आली. बीसीसीआयची मेडीकल टीम या तिघांवरही लक्ष ठेवून आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी खेळाडूंसह सर्व प्रशिक्षक वर्गाचं लसीकरण झालेलं होतं. यानंतरही रवी शास्त्री आणि इतर तिघांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

सुदैवाने इतर खेळाडूंना कोरोनाची लागण झालेली नसल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सर्वांना खेळण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार रवी शास्त्री यांनी संघाच्या बायो सिक्युअर बबलमधून बाहेर पडत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. ज्यात बाहेरचे लोकं सहभागी होते. इथेच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी रात्री ८ वाजल्याच्या दरम्यान रवी शास्त्रींना त्रास जाणवल्यानंतर मेडीकल टीमने त्यांची lateral flow test केली. ज्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

    follow whatsapp