India Today Conclave 2023 :
ADVERTISEMENT
नवी दिल्ली : मोदी सरकार (Modi Government) आल्यापासून गरिबांच्या मनात स्वप्नं पाहण्याची आशा निर्माण झाली. त्यामुळे येत्या काळात देश स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करत असेल, तेव्हा भारत (India) जगाच्या पुढे उभा असलेला दिसेल, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी व्यक्त केलं. ते आज (शुक्रवारी) इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या (India Today Conclave 2023) 20 व्या भागात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळापर्यंतच्या अनेक प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिली. (Attendance of Union Home Minister Amit Shah at India Today Conclave 2023)
जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून पंतप्रधान मोदींच्या कामांची तुलना करण्याच्या प्रश्नावर अमित शहा म्हणाले, प्रत्येकाने आपापल्या काळात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी त्यांच्या आकलनशक्तीनुसार आणि वेळेनुसार काम केलं आहे. पण प्रत्येक वेळी वेगवेगळी आव्हानं असतात. प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी असते आणि त्यांची दृष्टी असते. परंतु प्रत्येकाने चांगला प्रयत्न केला आहे, माझा यावर विश्वास आहे. मोदीजींबद्दल सांगायचं झालं तर मोदीजींनी भारतातील लोकांमध्ये महत्त्वाकांक्षा जागृत करण्याचं काम केलं आहे.
गरीबही जनताही आशेची स्वप्न पाहत आहेत :
शाह पुढे म्हणाले, देशातील 60 कोटी गरीब जनता स्वप्न पाहण्याचं धाडस करु शकत नव्हते, त्या गोरगरीब जनतेच्या मनात मोदीजींनी स्वप्न बघण्याचा विश्वास दिला आहे. आज नरेंद्र मोदीजींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात एक स्वप्न निश्चितपणे पेरलं आहे ते म्हणजे जेव्हा स्वातंत्र्याची शताब्दी साजरी होईल तेव्हा भारत संपूर्ण जगात पहिला असेल. भारत जगातील प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असेल.
केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले, आज जगात कोणतीही समस्या असो, नरेंद्र मोदी या समस्येवर काय बोलणार याकडे जगातील नेत्यांचं लक्ष लागलेलं असतं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हा मोठा बदल 2014 ते 2023 या काळात झाला आहे. जगातील प्रत्येक समस्या सोडवण्याचा भारताचा दृष्टिकोन, भारताच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला महत्त्व दिलं जातं.
India Today Conclave 2023 : PM मोदी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हला करणार संबोधित
‘देशाच्या साधनसंपत्तीवर प्रत्येकाचा हक्क आहे’
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हापासून त्यांचा एकच अजेंडा आहे की या देशाच्या संसाधनांवर प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येकाचे जीवनमान उंचावले पाहिजे. ते म्हणाले की, देशातील सुमारे 60 कोटी लोकांकडे बँक खाते नव्हते. सुमारे 10 कोटी लोकं शौचालयाशिवाय जगत होते आणि सुमारे 3 कोटी घरांमध्ये वीज नव्हती. पण भाजप सरकारच्या स्थापनेनंतर 9 वर्षात प्रत्येक कुटुंबाकडे बँक खाते आहे आणि प्रत्येक घरात वीज आणि शौचालय आहे.
India Today Conclave : ‘वनडे क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी…’,सचिन तेंडुलकरने सांगितला प्लान
अमित शाह म्हणाले की, कोविडचा सामना करण्याच्या भारताच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्या जगातील मोठ्या मोठ्या तज्ञांना चुकीचे सिद्ध केलं आहे. लसीकरण आणि तंत्रज्ञानाद्वारे भारताने कोविडला चांगले हाताळले. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये गुंतवणूक दिसून आली आहे आणि पर्यटन वाढत आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये 70% घट झाली आहे. दगडफेक पूर्णपणे थांबली आहे. ते म्हणाले की, हे सर्व पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे घडले आहे.
ADVERTISEMENT