Kolkata Rape And Murder Case: देशव्यापी बंदला १०० टक्के प्रतिसाद; IMA च्या प्रमुख मागण्या कोणत्या? 

मुंबई तक

17 Aug 2024 (अपडेटेड: 17 Aug 2024, 06:04 PM)

Kolkata Rape And Murder Case Latest Update: कोलकाताच्या आरजी कर महाविद्यालयातील निवासी डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आज डॉक्टरांनी देशव्यापी संप केला. २४ तासांसाठी आरोग्य सेवा बंद करण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतला होता.

IMA Protest Update

IMA Protest Update

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संपात डॉक्टरांनी केला कोलकाताच्या घटनेचा तीव्र निषेध

point

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

point

आंदोलनात आयएमएसह आयडीए, निमा, आयुर्वेद व्यासपीठ, कल्याण होमीओपॅथी संघटना, कल्याण केमिस्ट संघटना, फीजिओथेरपी संघटनांचा सहभाग

मिथिलेश गुप्ता

हे वाचलं का?

Kolkata Rape And Murder Case Latest Update: कोलकाताच्या आरजी कर महाविद्यालयातील निवासी डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आज डॉक्टरांनी देशव्यापी संप केला. २४ तासांसाठी आरोग्य सेवा बंद करण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतला होता. या बंदला कल्याणमध्येही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात कल्याणच्या डॉक्टरांच्या आयएमएसह आयडीए, निमा, आयुर्वेद व्यासपीठ, कल्याण होमीओपॅथी संघटना, कल्याण केमिस्ट संघटना, फीजिओथेरपी संघटना सहभागी झाल्या होत्या. 

'या' आहेत इंडियन मेडीकल असोसिएशनच्या प्रमुख मागण्या

१) डॉक्टर आणि रुग्णालयांसाठी कोविड काळात लागू असलेला अध्यादेश कायम करावा.
२) सर्व रुग्णालयांचा विमानतळाच्या धर्तीवर सुरक्षा प्रोटोकॉल असावा.
३) 36 तासांच्या ड्युटी शिफ्टचे आणि विश्रांती घेण्यासाठी अपुऱ्या सुरक्षीत जागा आणि पुरेशा विश्रांती कक्षांचे  पूनर्वलोकन करणे.
३) गुन्ह्यांची काळजीपूर्वक आणि व्यावसायिक तपासणी करून न्यायप्रदान करणे. विध्वंसक हुल्लडबाजांना कठोर शिक्षा देणे.
४) पीडित कुटुंबाला अत्याचाराच्या क्रूरतेशी सुसंगत योग्य आणि सन्माननीय नुकसान भरपाई देणे.

हे ही वाचा >> Eknath Shinde: "सावत्र कपटी भावावर..."; लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यात CM शिंदेंचं विरोधकांवर शरसंधान

कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील इंडियन मेडीकल असोसिएशन कार्यालय परिसरात डॉक्टरांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने डॉक्टर आणि वैद्यकीय सेवांसाठी कोविड काळाप्रमाणे अत्यंत कठोर कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली. "अशा घटना घडतात जेव्हा घडतात, तेव्हा नेहमी डॉक्टरांनाच का टार्गेट केले जाते, आपण स्वतःच्या अधिकारासाठी उभे राहिले पाहिजे, लोकांबरोबर उभे राहणेही गरजेचे आहे, आपल्याला हवाय तो बदल घडवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांसोबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे", अशाप्रकारचं मतंही डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केलं.

हे ही वाचा >> "...तर महिलांसोबत उपोषणालाच बसेल...", सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, नेमकं प्रकरण काय? 

डॉक्टर संघटनांकडून कल्याणचे पोलीस अधिक्षक कल्याणजी घेटे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर, निमा अध्यक्ष डॉ. शाम पोटदुखे, महाराष्ट्र रेडिओलॉजीस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, आयुर्वेद व्यासपीठ कल्याणचे अध्यक्ष डॉ.विपुल कक्कड, आयडीएचे पवन यालगी, केम्पाचे डॉ. नीरज पाल, आयएसएचे डॉ. प्रकाश देशमुख, कल्याण फार्मसिस्टचे गणेश शेळके, केएचडीएफचे डॉ. राहुल काळे यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर मंडळी उपस्थित होती. ज्यामध्ये महिला डॉक्टरांची संख्याही लक्षणीय होती. 

    follow whatsapp