कोरोनाची उत्पत्ती वुहानमधूनच ! मराठी वैज्ञानिक दाम्पत्याचा संशोधनातून दावा

मुंबई तक

• 06:50 AM • 06 Jun 2021

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. आतापर्यंत भारतासह अनेक देशांत या विषाणूने लाखोंचे बळी घेतले. परंतू गेल्या काही महिन्यांपासून या विषाणूची उत्पत्ती कुठून झाली यासंदर्भात अनेक कयास आणि तर्क-वितर्क लढवले जात आहेत. चीनच्या वुहान येथील लॅबमधून हा व्हायरस जगभरात पसरल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. त्यातच पुण्यामधील एका वैज्ञानिक दाम्पत्याने या संदर्भातली काही तथ्य एकत्रित […]

Mumbaitak
follow google news

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. आतापर्यंत भारतासह अनेक देशांत या विषाणूने लाखोंचे बळी घेतले. परंतू गेल्या काही महिन्यांपासून या विषाणूची उत्पत्ती कुठून झाली यासंदर्भात अनेक कयास आणि तर्क-वितर्क लढवले जात आहेत. चीनच्या वुहान येथील लॅबमधून हा व्हायरस जगभरात पसरल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. त्यातच पुण्यामधील एका वैज्ञानिक दाम्पत्याने या संदर्भातली काही तथ्य एकत्रित केले आहेत.

हे वाचलं का?

आतापर्यंत चीनने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत कोरोना विषाणूची निर्मिती ही सी-फूड मार्केटमधून झाल्याचं सांगितलं आहे. परंतू डॉ. राहुल बाहोलिकर आणि डॉ. मोनाली राहलकर या दाम्पत्याने याविषयात संशोधन करुन हा विषाणू वुहान लॅबमधूनच जगभरात पसरल्याची शक्यता असल्याचे काही पुरावे गोळा केले आहेत. मुंबई तक ने यासंदर्भात शास्त्रज्ञ दाम्पत्याशी संवाद साधून याविषयी अधिक माहिती घेतली.

“सार्स- सीओव्ही २ शी संबंधित असलेल्या आरटीजी १३ चे नमुने दक्षिण चीनच्या युनान प्रांतातील मोजियांकच्या गुहांमधून एकत्रित करण्यात आले ही बाब आमच्या लक्षात आली. आरटीजी १३ हा देखील कोरोना व्हायरसच आहे. हा व्हायरस वुहान मधील प्रयोगशाळेत नेण्यात आला. या गुहांमध्ये मोठ्या प्रमाणात वटवाघळं होती. ही गुहा साफ करण्यासाठी सहा खाण कामगारांना ठेवण्यात आलं होतं. या कामगारांना नंतर न्युमोनियाने ग्रासलं हे आम्हाला लक्षात आलं.”

सी-फूड मार्केटमधून कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याचं कोणतेही ठोस पुरावे समोर आले नसल्याचंही या शास्त्रज्ञ दाम्पत्याने सांगितलं. व्हायरस वटवाघळांमधून हस्तांतरित झाला आणि मग तो सी-फूड मार्केटमधून सर्वत्र पसरला अशी एक थेअरी मांडली जाते. या व्हायरसची संरचना अशी पद्धतीने झाली होती की तो मानवाला संक्रमीत करेल, त्यामुळे हा विषाणू लॅबमध्येच तयार झाला आहे असं म्हणायला वाव आहे. गुहेत सापडलेल्या व्हायरसच्या जीनोममध्ये काही बदल करण्यात आल्यानंतरच कोरोना विषाणूची निर्मीती झाली. त्यादरम्यान वुहानमध्ये अनेक प्रयोगशाळा व्हायरसवर प्रयोग करत होत्या. याचदरम्यान कोरोनाची उत्पत्ती झाली असावी असा अंदाज बाहुलिकर आणि राहलकर या शास्त्रज्ञ दाम्पत्याने वर्तवला आहे.

    follow whatsapp