ADVERTISEMENT
सांगली जिल्ह्यात (Sangli) ज्येष्ठ महिलांनी महिला दिनाचं सेलिब्रेशन अगदी भन्नाट केलं आहे.
यावेळी या ज्येष्ठ महिलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. आम्हीही कोणापेक्षा कमी नाही हे त्यांनी दाखवून दिलं.
वयाची सत्तरी उलटल्यानंतर जिथे चार पावलं चालणंही अशक्य होतं त्यावेळी या महिलांनी चक्क लेझीम खेळली आहे.
लेझीम खेळून आपला फिटनेस या वयातही उत्तम असल्याचं त्यांनी जगासमोर आणलं आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्मायली हास्य आणि योगा क्लबच्या या ज्येष्ठ वयोगटातील महिलांनी लेझीम खेळण्याचा मानस व्यक्त केला होता.
सांगलीच्या विसावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लेझीमच्या स्टेप्स शिकवल्या.
अवघ्या दहा दिवसांच्या सरावात या महिलांनी लेझीमच्या तालेवर पावलं उचलली आणि उत्तम खेळून दाखवली आहे.
ADVERTISEMENT