मनसेचं मध्यरात्री खळ्ळ खट्यॅक! आयपीएल खेळाडूंसाठी महाराष्ट्राबाहेरून आणलेल्या बस फोडल्या

मुस्तफा शेख

• 05:46 AM • 16 Mar 2022

लवकर आयपीएल स्पर्धा सुरू होत असून, आयपीएलमधील खेळाडूंसाठी महाराष्ट्राबाहेरून आणलेल्या बसेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत. मंगळवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी ५ ते ६ अज्ञात कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयपीएलचा १५ हंगाम लवकरच सुरू होत असून, तयारी जोरात सुरू आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी विशेष बसेस असणार आहेत. या बसेस महाराष्ट्राबाहेरून मागवण्यात […]

Mumbaitak
follow google news

लवकर आयपीएल स्पर्धा सुरू होत असून, आयपीएलमधील खेळाडूंसाठी महाराष्ट्राबाहेरून आणलेल्या बसेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत. मंगळवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी ५ ते ६ अज्ञात कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

आयपीएलचा १५ हंगाम लवकरच सुरू होत असून, तयारी जोरात सुरू आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी विशेष बसेस असणार आहेत. या बसेस महाराष्ट्राबाहेरून मागवण्यात आल्यानं मनसेनं याला विरोध दर्शवला आहे.

आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी आणण्यात आलेल्या बसेस महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी घडली. ताज हॉटेलसमोर उभ्या असलेल्या या बसेसची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. १५ मार्चच्या मध्यरात्री हा प्रकार घडला.

बसेसवर पोस्टर लावत मनसेच्या कार्यकर्त्यांना तोडफोड केली असून महाराष्ट्रात मराठी वाहतूकदारांना काम मिळालं पाहिजे, अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. मनसेचा दणका अशा आशयाचे पोस्टर बसेसवर लावण्यात आले होते.

CSK vs KKR सामन्याने IPL 2022 च्या हंगामाला सुरुवात, जाणून घ्या यंदाच्या हंगामाचं वेळापत्रक

दरम्यान, या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात ५ ते ६ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४९ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

आयपीएलमधील संघाच्या प्रवासासाठी दिल्लीतील एका कंपनीला कंत्राट दिलं गेलं आहे. स्थानिक वाहतूकदारांना काम मिळत नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

प्रत्येक इनिंगमध्ये दोन DRS ते सुपर ओव्हर; IPL 2022 साठी नियमांमध्ये महत्वाचे बदल

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आयपीएलचा थरार

आयपीएलच्या आगामी हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएल स्पर्धा देशातच खेळवली जात असली, तरी कोविडच्या सावटामुळे यंदाची आयपीएल महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्येच खेळवली जाणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने यंदाच्या हंगामाला सुरुवात होईल.

    follow whatsapp