ADVERTISEMENT
मुकेश आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी रिलायन्स रिटेलचा व्यवसाय सांभाळत आहे.
23 ऑक्टोबर 1991 रोजी जन्मलेल्या ईशा अंबानीने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले.
तिने अमेरिकेतील येल विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने स्टॅनफोर्डमधून एमबीए केले.
फोर्ब्सने 2018 मध्येच ईशा अंबानीची संपत्ती 70 दशलक्ष डॉलर्स असल्याचा अंदाज वर्तवला होता.
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी ईशाने वडिलांना रिलायन्सचा बिझनेस सांभाळण्यात मदत करायला सुरुवात केली.
ईशा अंबानी ऑक्टोबर 2014 मध्ये रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या बोर्डात सामील झाली.
रिलायन्सचा व्यवसाय हाती घेतल्यानंतर ईशा अंबानीने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने झपाट्याने प्रगती केली.
AJIO एप्रिल 2016 मध्ये ईशा अंबानीच्या देखरेखीखाली लॉन्च करण्यात आले, जे रिलायन्स ग्रुपचे मल्टी-ब्रँड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे.
आज ईशा अंबानीकडे एका मोठ्या कॉर्पोरेटची कमान आहे, पण तिचे खरे स्वप्न शिक्षिका बनण्याचे होते. पण नंतर तिला कौटुंबिक व्यवसाय सांभाळावा लागला.
ADVERTISEMENT