शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणींत भर, 36 पेक्षा जास्त ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

दिव्येश सिंह

• 09:59 AM • 03 Mar 2022

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणींमध्ये चांगलीच भर पडली आहे. शिवसेना नेते यशवंत जाधवांसह कंत्राटदारांच्या 36 ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यामुळे त्यांची 130 कोटींची संपत्ती, 36 स्थावर मालमत्ता हे सारं काही गोत्यात आलं आहे. हवालामार्फत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव आणि त्यांचे सहकारी BMC कंत्राटदार […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणींमध्ये चांगलीच भर पडली आहे. शिवसेना नेते यशवंत जाधवांसह कंत्राटदारांच्या 36 ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यामुळे त्यांची 130 कोटींची संपत्ती, 36 स्थावर मालमत्ता हे सारं काही गोत्यात आलं आहे. हवालामार्फत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

शिवसेना नेते यशवंत जाधव आणि त्यांचे सहकारी BMC कंत्राटदार यांच्या निवासस्थानी झडती घेतल्यानंतर आयकर विभागाला पुरावे सापडले आहेत. ठेकेदार आणि यशवंत जाधव यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचंही समोर आलं आहे. आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३ डझनपेक्षा जास्त अशा प्रॉपर्टीज आहेत ज्यांची किंमत 130 कोटींच्या घरात आहे. यशवंत जाधव यांच्या घरी मोठं घबाड झालं होतं. 35 ठिकाणी छापेमारी करून ही मालमत्ता, संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

आयकर विभागाला यशवंत जाधव यांनी आंतराराष्ट्रीय हवाला व्यवहार आणि अवैधरित्या कमावलेले पैसे यासंबंधीचेही पुरावे सापडले आहेत. या सगळ्यात त्यांचा सहभाग होता हेदेखील कळलं आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरांची आणि इतर ठिकाणांवर छापे मारले असता काही कोटी रूपये रकमेची देवाणघेवाण झाल्याच्या पावत्याही आढळून आल्या आहेत.

मुंबई महापालिकेची कंत्राटं घेणारे काही कंत्राटदार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.२५ फेब्रुवारीला मुंबईत शोध आणि जप्तीची करावाई करण्यात आली. तसंच त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली.

बिमल अग्रवाल, मदनी, बिपिन जैन आणि लँडमार्क इन्फ्रास्ट्रक्चर या BMC कंत्राटदारांवर छापे टाकून त्यांच्या जागेची झडती घेण्यात आली. अग्रवालला यापूर्वी सट्टेबाजीशी संबंधित प्रकरणात ईडीने अटक केली होती आणि मुंबई पोलिसांना हलक्या दर्जाचे बॉम्ब निकामी करणारे सूट पुरवल्याबद्दलही त्याची चौकशी करण्यात आली होती.

    follow whatsapp