ADVERTISEMENT
बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूरचंही नाव घेतलं जातं.
जान्हवीने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळी भूमिका साकारली आहे. तिच्या अदाकारीची चर्चा ही नेहमीच असते.
जान्हवी कपूरने 2018 मध्ये धडक चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
जान्हवीचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म 6 मार्च 1997 रोजी झाला आहे. अगदी कमी काळात तिने सवत:ची एक वेगळी ओळख बनवली.
पण, जान्हवीची आई म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना जान्हवीने फिल्म इंडस्ट्रीत करिअर करावं अशी अजिबात इच्छा नव्हती.
एका मुलाखतीत, जान्हवी म्हणाली होती की, तिच्या आईला तीने डॉक्टर बनावं असं वाटत होतं.
मुंबईतील धीरूबाई अंबानी इंटरनॅशननल शाळेत जान्हवीने आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
यानंतर, जान्हवीने अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केलं. तिथे तिने अॅक्टिंगचा कोर्स केला.
जान्हवीने फिल्म संस्थानमधूही अॅक्टिंगचा कोर्स केला. यानंतर 2018 पासून बॉलीवूडमध्ये तिने करिअरला सुरूवात केली.
ADVERTISEMENT