अँटेलिया बाँब आणि मनसुख हिरेन प्रकरणात परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आज पहिल्यांदाच बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात सुरुवातीला मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या ATS चे प्रमुख जयजीत सिंग यांना ठाणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
जयजीत सिंग हे सध्या दहशतवादविरोधी पथकात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जागेवर विनीत अग्रवाल यांच्याकडे ATS चा पदभार सोपवण्यात आला आहे. ठाण्याचे सध्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पदोन्नती मिळून त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पोलीस महानिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Mansukh Hiren Murder Case : पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे सेवेतून बडतर्फ
कोण आहेत जयजीत सिंग, जाणून घ्या…
-
जयजीत सिंग १९९० च्या आयपीएस बॅचचे अधिकारी
-
ऑक्टोबर २०२० मध्ये जयजीत यांच्याकडे ATS ची जबाबदारी आली
-
त्याआधी जयजीत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरीक्त पोलीस महासंचालक म्हणूनही काम केलंय.
-
त्याआधी जयजीत सिंग मुंबई रेल्वे पोलीस अतिरीक्त महासंचाक म्हणून कार्यरत होते.
ADVERTISEMENT