Crime | Murder :
ADVERTISEMENT
गुन्हेगारी जगतात अशी अनेक प्रकरण असतात ज्यांचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरतो ना कोणता पुरावा, ना कोणता साक्षीदार असतो. मात्र या प्रकरणांचा उलगडा झाल्यानंतर आणि त्यामागील कारण समोर आल्यानंतर धक्का बसतो. असंच एक धक्कादायक प्रकरण झारखंड राज्यातून समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक तर होताच, पण त्याचा खुलासाही तितकाच रंजक होता.
ऑगस्ट २०१९ मध्ये झारखंड पोलिसांना गढवा जिल्ह्यातील गोंडाजवळ राष्ट्रीय महामार्ग – ७५ वर एका महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपास सुरु केला. मृतदेह रस्त्याकडेला पडला होता. डोक्यावर जखमा आणि अंगावर रक्त दिसतं होतं. त्यामुळे प्रथमदर्शनी हा अपघात असून महिलेचा मृत्यू वाहनाच्या धडकेनं झाल्याचं निरीक्षण पोलिसांनी नोंदवलं.
Crime : पत्नीने आखला पतीच्या हत्येचा प्लॅन; सुपारीचा असा झाला भांडाफोड
मृतदेह सापडल्याच्या अवघ्या काही तासांतच पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली. मृत महिलेचं अंदाजे वय ३३ वर्षे होतं आणि ती घटस्फोटित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महिलेचा मृत्यू अपघातात झाल्याचं सांगितल्यानंतर कुटुंबीयांचा विश्वास बसला नाही. आपल्या मुलीचा खून झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला. खून केल्यानंतर तिचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर फेकून दिला असावा, अशी शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली.
कुटुंबीय आणि स्थानिकांची मागणी पाहून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष पथक स्थापन केलं. या पथकाने प्रकरणाचा तपास सुरु केला. अशातच शवविच्छेदन अहवालात मृत महिलेच्या डोक्याला खोल दुखापत झाली असून जड वस्तूने हल्ला केल्यामुळे झाली असावी असं म्हटलं होतं. यानंतर पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी तपास केला. पण त्यातूनही काही साध्य झालं नाही.
Crime : शेतकरी महिलेची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे; ओलांडली क्रूरतेची सीमा!
तपासादरम्यान पोलिसांचं पथक मृत महिलेच्या घरीही पोहचलं. खोलीची झडती घेत असतानाच पोलिसांनी एक सिमकार्ड जप्त केलं. सिमकार्ड सापडल्यानंतर या प्रकरणावरुन हळू हळू पडदा उठू लागला. हे सिमकार्ड मृत महिलेचे नसून तिचा घटस्फोटित पतीचा पुतण्या सद्दाम अन्सारीचं असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी २५ वर्षीय सद्दामला ताब्यात घेतलं. यावेळी सद्दामने चौकशीत जो खुलासा केला तो धक्कादायक होता.
का आणि कोणी केली हत्या?
सद्दाम अन्सारीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, मृत महिलेचा तिचे काका हबीबुल्ला यांच्यासोबत लग्न झालं होतं आणि नंतर दोघांचा घटस्फोटही झाला. पण सद्दामला त्याची काकी आवडू लागली होती. तो तिच्यावर मनापासून प्रेम करु लागला होता. एके दिवशी त्याने आपल्या मनातील गोष्ट काकीला सांगितली. त्यावर तिने काही प्रत्युत्तर दिलं नाही, पण काही दिवसातचं तीही सद्दामवर प्रेम करू लागली. नात्यातील मोठेपण विसरून तिने पुतण्याशी संबंध प्रस्थापित केले.
दोघांचे प्रेमसंबंध काही दिवस व्यवस्थित चालू होते. मात्र काकीने सद्दामवर लग्नासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. सद्दाम नकार देत राहिला, तो लग्नासाठी तयार नव्हता. पण आता ती सर्वांना याविषयी सांगण्यास सांगू लागली. यामुळे सद्दाम चांगलाच संतप्त झाला. म्हणून, त्याने काकीलाच मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने कट रचला.
Crime: दारु, पॉर्न Video अन् 32 वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलासोबत नको ते केलं!
कटानुसार, सद्दामने एके दिवशी आपल्या काकीला कोर्ट मॅरेजच्या बहाण्याने एका निर्जन स्ठळी बोलावलं. ती ही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिथं आली. ती तिथं पोहोचताच सद्दाम आधीच उपस्थित होता. दोघांमध्ये संवाद सुरु असतानाच सद्दामने अचानक डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. महिलेच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि प्रचंड रक्तस्त्राव होत ती जमिनीवर पडली. मारहाणीनंतर काकीचा काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर सद्दामने मृतदेह हायवेवर नेत हा अपघात असल्याचं दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस तपासात हे खुनाचे गूढ उलगडलं.
ADVERTISEMENT