सह्याद्री अतिथीगृहातील झुंबर स्लॅबसह कोसळलं, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात वाचले

मुंबई तक

• 03:04 PM • 04 Jun 2021

मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहातील मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळलं. आज संध्याकाळी 4.45 वाजता सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरचं शोभेचं झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळलं. अचानक झालेल्या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. मात्र दुर्घटना जीवघेणी होती. त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहातील मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळलं. आज संध्याकाळी 4.45 वाजता सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरचं शोभेचं झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळलं. अचानक झालेल्या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही. मात्र दुर्घटना जीवघेणी होती. त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. आदित्य ठाकरे या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले

हे वाचलं का?

मुंबईतल्या Corona रूग्णसंख्येत पुन्हा घट, आदित्य ठाकरे म्हणतात…

सह्याद्री अतिथी गृहाचं हे बांधकाम 25 वर्षांपूर्वीचे आहे. या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आहे. अहवाल आल्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतर लगेचच दुरूस्तीच्या कामालाही सुरूवात करण्यात आली. हॉल क्रमांक ४ बाहेरील स्लॅबसह झुंबर अचानक कोसळलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली, यानंतर सह्याद्री अतिथीगृहात असलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर हलवण्यात आलं आहे.

आदित्य ठाकरे हे यावेळी निवडणूक झाल्यानंतर वरळीतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ठाकरे घराण्यातले निवडणूक लढवणारे आणि आमदार म्हणून निवडून आलेले ते पहिले ठाकरे ठरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पर्यटन मंत्री म्हणून शपथ घेतली. आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगराचे पालक मंत्रीही आहेत. आज आदित्य ठाकरे सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेत होते. त्यावेळी हॉल क्रमांक चारच्या बाहेरचं झुंबर स्लॅबसह कोसळलं. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. आतमधल्या कक्षात आदित्य ठाकरे बैठक घेत होते. ते थोडक्यात बचावले आहेत. या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.

    follow whatsapp