अँटिव्हायरस सॉफ्टवेअरचे संस्थापक जॉन मॅकॅफे यांचा मृत्यू झाला आहे. स्पेनच्या तुरुंगात त्यांचा मृतदेह आढळला आहे. स्पॅनिश कोर्टाने त्यांच्या अमेरिका प्रत्यार्पणाची परवानगी दिल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृतदेह आढळून आला. कारागृह अधिकाऱ्याने त्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. AFP ने दिलेल्या वृत्तानुसार कर चुकवल्याप्रकरणी जॉन मॅकॅफे अमेरिकेकडून फरार घोषित करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
कोण आहेत जॉन मॅकॅफे ?
McAfee यांचा जन्म UK मध्ये 1945 मध्ये झाला. त्यांचे आई वडिल त्यानंतर व्हर्जिनियाला गेले, तेव्हा जॉन 15 वर्षांचे होते. त्याच वर्षी त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली. जॉन यांच्या वडिलांना दारू पिण्याचं व्यसन होतं. मला त्यांची खूप आठवण येते असं जॉन यांनी एका मासिकाला 2012 मध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांच्या वडिलांचा सहवास त्यांना कमी लाभला पण त्यांचा मॅकॅफे यांच्या आयुष्यावर प्रभाव होता.
दरम्यान 75 वर्षीय जॉन हे बार्सिलोना येथील तुरुंगात होते. जॉन मॅकॅफे यांनी आत्महत्या केली असावी असा संशय तुरुंग अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र यापेक्षा जास्त माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. जॉन मॅकेफे यांना ऑक्टोबर 2020 मध्ये बार्सिलोना विमानतळावरून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. इस्तंबूलला जाण्यासाठी ते या विमानतळावर आले होते. त्यावेळीच त्यांना अटक करण्यात आली होती.
कन्सल्टिंग, क्रिप्टोकरन्सी तसंच आपल्या आयुष्यावर आधारित कथानकांसाठी हक्क विकून त्यांनी कोट्यवधी रूपये मिळवले. असं असूनही त्यांच्यावर 2014 ते 2018 या कालावधीत कर बुडवल्याचा आरोप लावण्यात आला. त्यांनी जाणीवपूर्वक हा कर बुडवल्याचंही म्हटलं गेलं. त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले असते तर त्यांना किमान तीस वर्षांची शिक्षा झाली असती.
स्पेनमधल्या कोर्टाने बुधवारी जॉन मॅकॅफे यांच्या अमेरिका प्रत्यार्पणासाठी संमती दिली होती. अमेरिकेने यासंदर्भातल नोव्हेंबरमध्ये विनंती केली होती. एवढंच नाही तर चार वर्षात मॅकॅफे यांनी चार वर्षांमध्ये 10 मिलियन युरोज कमावले असून त्यावरचा कर त्यांनी भरलेला नाही. जॉन मॅकॅफे यांनी 16 जून रोजी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी अमेरिकेकडे चुकीची माहिती असल्याचं म्हटलं होतं आणि आपली संपत्ती जप्त करण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता त्यांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT