महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई तक

• 08:25 AM • 12 Jan 2022

सुरेंद्र रामटेके, प्रतिनिधी, वर्धा महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना वर्धा न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वर्धा शहर पोलिसांनी कालीचरण महाराजांना आज पहाटेच्या सुमारास ताब्यात घेत अटक करण्यात आली होती .वर्धा न्यायालयात कालीचरण महाराजांना पोलिसांनी अकरा वाजता आणण्यात आले होते . त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र शहरात तणावाचे वातावरण आहे […]

Mumbaitak
follow google news

सुरेंद्र रामटेके, प्रतिनिधी, वर्धा

हे वाचलं का?

महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना वर्धा न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वर्धा शहर पोलिसांनी कालीचरण महाराजांना आज पहाटेच्या सुमारास ताब्यात घेत अटक करण्यात आली होती .वर्धा न्यायालयात कालीचरण महाराजांना पोलिसांनी अकरा वाजता आणण्यात आले होते . त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र शहरात तणावाचे वातावरण आहे एकीकडे बजरंग दलाचे कार्यकर्ते कोर्टासमोर उभे आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते ही निषेध व्यक्त करत आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे.

न्यायालयाने कालीचरण महाराजांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे अशी माहिती महाराजांचे पक्षकार वकील यांनी दिली आहे. मात्र त्यांच्या वतीने जामीन अर्ज आम्ही दाखल करणार आहोत त्यासाठी प्रक्रिया आम्ही सुरू केली असल्याचे वकील विशाल टिबडीवाल यांनी सांगितलं आहे.

Kalicharan: कालीचरण महाराजांचं अत्यंत वादग्रस्त भाषण, नवा Video व्हायरल

कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरून टीका केली होती त्यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे तक्रार शहर ठाण्यात दाखल करण्यात आली होती आमच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली त्यांचे अभिनंदन तर महात्मा गांधी बद्दल अपशब्द बोलणार्‍याला कालीचरण महाराजांचा निषेध गांधी पुतळा जवळ आम्ही निषेध करीत आहोत असंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

कालीचरण महाराज यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं?

रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द उच्चारले होते. ते म्हणाले होते, ‘राजकारणातून राष्ट्र काबीज करणे हे इस्लामचे ध्येय आहे. आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी 1947 मध्ये ते ताब्यात घेतले… त्यांनी यापूर्वी इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. नंतर त्यांनी राजकारणातून बांगलादेश आणि पाकिस्तान काबीज केले होते… मी मोहनदास करमचंद गांधींची हत्या केल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो.’ असं वक्तव्य करताना कालीचरण यांनी गांधींजीबाबत शिवराळ भाषेचा वापर केला होता.

महंत रामसुंदर दास यांनी सोडला होता मंच

कालीचरण यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेसचे माजी आमदार आणि छत्तीसगड गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष महंत रामसुंदर दास म्हणाले की, ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राष्ट्रपिताविरुद्ध असे अपमानास्पद शब्द वापरले जाऊ नयेत.’

दास म्हणाले, ‘ज्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो मार्ग हरवला आहे. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महात्मा गांधींना देशद्रोही ठरवले जात आहे. मला आयोजकांना विचारायचे होते की त्यांनी असा आक्षेप का घेतला नाही? मला माफ करा, पण मी या कार्यक्रमातून स्वत: माघार घेत आहे.’ त्यानंतर दास स्टेजवरून निघून गेले होते.

    follow whatsapp