कल्याण: चुकीच्या उपचारामुळे दीड वर्षीय चिमुकली दगावली, कोर्टाच्या आदेशानंतर डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

मुंबई तक

• 01:15 PM • 10 Dec 2021

मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण मध्ये उपचारादरम्यान एका दीड वर्षीय मुलीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र, पोलिसांकडे याप्रकरणी पुरावे नसल्याने कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत करण्यात आली नव्हती. मात्र, आता याबाबत थेट कोर्टाच्या आदेशानंतर कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. पोलिसात तक्रार दाखल करुनही आरोपी डॉक्टरवर कोणतीही कारवाई […]

Mumbaitak
follow google news

मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण मध्ये उपचारादरम्यान एका दीड वर्षीय मुलीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र, पोलिसांकडे याप्रकरणी पुरावे नसल्याने कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत करण्यात आली नव्हती. मात्र, आता याबाबत थेट कोर्टाच्या आदेशानंतर कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे.

हे वाचलं का?

पोलिसात तक्रार दाखल करुनही आरोपी डॉक्टरवर कोणतीही कारवाई होत नसल्याने निराश झालेल्या आई-वडिलांनी आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी थेट कल्याणच्या फौजदारी न्यायालयात धाव घेतली.

यावेळी कल्याण न्यायालयाने मुलीच्या आई-वडिलांनी डॉक्टरसोबत झालेल्या बोलण्याचे स्टिंग ऑपरेशन ग्राह्य धरुन याच व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या आधारावर संबंधित डॉक्टर आणि त्याच्या एका सहकार्यवर 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टर एस के आलम व ताज अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आता तपास सुरु झाला आहे.

कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात हे दोघे क्लिनिक चालवत होते. ताज अन्सारी हा एस के आलम यांच्या लेटरहेडचा वापर करत रुग्णांना चुकीचे औषध देत होता. तसेच फिर्यादी यांच्या मुलीला देखील चुकीचे उपचार दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांकडून करण्यात आला आहे.

या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

मृत मुलीच्या आईचे डॉक्टर आणि पोलीस प्रशासनाविरोधात गंभीर आरोप

‘5 तारखेला माझ्या मुलीला थोडासा ताप होता. त्यामुळे मी तिला अन्सारीच्या दवाखान्यात घेऊन गेले होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, औषध घ्या. आम्ही औषध घेतलं पण ताप उतरला नाही. त्यामुळे मी 6 तारखेला पुन्हा एकदा डॉक्टरकडे गेली. मी डॉक्टरांना सांगितलं की, तुमच्या औषधाने अधिकच त्रास झालाय माझ्या मुलीला.. तिला दम वैगरे लागतोय. तर डॉक्टरने मला सांगितलं की, आपण माझ्याकडेच तिचा उपचार सुरु ठेवूयात.’

‘त्यानंतर मी अडीच वाजता घरी आले आणि डॉक्टरांनी माझ्या मुलीला पुन्हा औषध दिलं. सात वाजेपर्यंत माझ्या मुलगी मृत पावली. यावेळी अन्सारी डॉक्टर म्हणायला लागला की, याच्याशी माझा काहीही संबंध नाही. यानंतर जेव्हा आम्ही टिळक नगर पोलीस स्थानकात गेलो तर ते म्हणाले हे आमच्या हद्दीत येत नाही. त्यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात पाठवलं. तर ते देखील असंच सांगायला लागले. आम्हाला पहाटे साडे तीन वाजेपर्यंत फिरवत राहिले.’

मांजरीच्या धक्क्याने सांडलेलं विषारी औषध दीड वर्षाच्या चिमुकल्याच्या पोटात, बाळाचा दुर्दैवी मृत्यू

‘दरम्यान, आम्ही मुलीला रुक्मिणीबाई रुग्णालयात गेलो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की, शवविच्छेदनासाठी तुम्हाला पोलिसांचा स्टॅम्प लागेल. माझे पती स्टॅम्प आणायला गेले. दुसरीकडे अंबादास भालेराव म्हणाले की, तुम्ही आता शवविच्छेदन केलं ना तर वर्षभरानंतर तुमचा रिपोर्ट येईल. आता येणार नाही.’

‘दुसरीकडे आम्हाला केस मागे घेण्यासाठी सातत्याने धमकी दिली जात आहे.’ असे गंभीर आरोप मुलीच्या आईने केले आहेत. त्यामुळे आता कोर्ट या प्रकरणात नेमकी कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp