दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाईची कमलजा रुपात पूजा

मुंबई तक

• 12:55 PM • 04 Nov 2021

दिवाळी पर्वातील आजचा नरक चतुर्थीचा दिवस! यंदा या दिवशीच लक्ष्मीपूजन असल्यानं, करवीर निवासिनी श्री अंबाबाईची कमलजा लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली होती. या मंदिरात अजूनही ई-पासशिवाय भाविकांना दर्शन मिळत नाही. ई-पास काढलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. स्थानिक भाविकांनी आई अंबाबाईचं मुखदर्शन घेतलं. याशिवाय ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. यावर्षी दीपावली तीन दिवसांची आहे. […]

Mumbaitak
follow google news

दिवाळी पर्वातील आजचा नरक चतुर्थीचा दिवस! यंदा या दिवशीच लक्ष्मीपूजन असल्यानं, करवीर निवासिनी श्री अंबाबाईची कमलजा लक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली होती. या मंदिरात अजूनही ई-पासशिवाय भाविकांना दर्शन मिळत नाही. ई-पास काढलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. स्थानिक भाविकांनी आई अंबाबाईचं मुखदर्शन घेतलं. याशिवाय ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

हे वाचलं का?

यावर्षी दीपावली तीन दिवसांची आहे. आज पहिल्या दिवशी नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस. पहाटे अभ्यंगस्नान झाल्यानंतर अनेकजण देवदर्शनासाठी बाहेर पडतात. यंदा नवरात्रौत्सवादिवशीच सर्व मंदिर दर्शनासाठी खुली झाली आहेत.

ज्यांनी ई-पास काढला आहे, अशा भाविकांनी मंदिरात जाऊन आई अंबाबाईच्या दर्शनाचा लाभ घेतला. तर ज्यांनी ई-पास काढलेला नाही, त्यांनी महाद्वार रोडवरून अंबाबाईचं मुखदर्शन घेतलं. लक्ष्मीपूजनानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीची कमलजा लक्ष्मी रुपातील मनोहारी पूजा बांधली होती. ही पूजा गजानन मुनिश्‍वर आणि मुकुल मुनीश्‍वर यांनी साकारली.

कोल्हापूरची अंबाबाई ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक दैवत आहे. माहुर, कोल्हापूर, तुळजापूर आणि वणी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठं आहेत. नवरात्र उत्सव असतो त्यावेळीही अंबाबाईची वेगवेळ्या रूपांमध्ये पूजा बांधली जाते. त्यामुळे देवीचं रूप आणखी खुलून आणि अधिक मनोहारी दिसतं. आज लक्ष्मीपूजन असल्याने अंबाबाईची पूजा कमलजा रूपात मांडण्यात आली आहे. देवीचं हे रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी भाविक येत आहेत.

कोरोना काळात मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मंदिरं बंद होती. यावर्षी नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरला मंदिरं सुरू कऱण्यात आली आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करताना लोकांचा ओढा मंदिरांकडेही आहे. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये त्याचप्रमाणे शिर्डीचं साईबाबाब मंदिर, शेगावचं गजानन महाराज मंदिर, अक्कलकोट येथील स्वामीसमर्थ मंदिर या ठिकाणीही भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे. दिवाळीनिमित्त भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेत आहेत आणि प्रसन्न मनाने दिवाळी साजरी करत आहेत.

कमलजा म्हणजेच कमळातून बाहेर आलेली देवी या रूपात आज कोल्हापूच्या अंबाबाईची पूजा बांधण्यात आली आहे. देवीचं हे रूप अत्यंत विलोभनीय आणि मन प्रसन्न करणारं आहे.

    follow whatsapp