कोरोनाचे रूग्ण वाढत असून बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनाही कोरोनाने विळखा घातला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन देखील कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. कोरोनाची लागण झाल्यावर कार्तिकने तातडीने सोशल मीडियावरून चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती. अखेर कार्तिकची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे.
ADVERTISEMENT
इन्स्टाग्रामवरून कार्तिकने ही आनंदाची बातमी शेअर केलीये. सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये कार्तिक म्हणतो, ‘निगेटीव्ह…14 दिवसांचा वनवास संपला. बॅक टू वर्क’. अभिनेता कार्तिक आर्यन लवकर भुलभुलैया 2 या सिनेमामध्ये दिसणार आहे. कार्तिक सोबत अभिनेत्री कियारा अडवाणी स्क्रिन शेअर करणार आहे. कोरोना निगेटीव्ह आल्यानंतर कार्तिक आता या सिनेमाचं राहिलेलं शूटींग पूर्ण करणार आहे.
तर दुसरीकडे कार्तिकचा ‘धमाका’ हा सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये कार्तिक एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. राम माधवानी दिग्दर्शित ‘धमका’ चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचा टीझर कार्तिक आर्यनने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला होता.
बॉलिवूड कलाकारांच्या मागे कोरोनाचं ग्रहण; अक्षय आणि गोविंदानंतर अजून 2 कलाकारांची भर
कार्तिक आर्यन कोरोनामुक्त झाला असून तो लवकरच शूटींगला सुरुवात करणार आहे. मात्र बॉलिवूडवरील कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. काल अभिनेता अक्षय कुमार तसंत गोविंदा यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर यामध्ये आता अजून काही सेलिब्रिटींची भर पडली आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अभिनेता विकी कौशल यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. त्याचप्रमाणे अभिनेता अक्षय कुमार कोरोनाच्या उपचारांसाठी रूग्णालयात दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आलिया भट्टला देखील कोरोनाची लागण झाली होती.
ADVERTISEMENT