Kasba Peth assembly Constituency By Election 2023 : कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघात (assembly Constituency) भाजपसमोर (Bjp) नाराजीनाट्य निर्माण करण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. चिंचवड (Chinchwad) आणि कसबा पेठ या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, भाजपने एकीकडे लक्ष्मण जगताप (Laxman jagtap) यांच्याच पत्नीला उमेदवारी दिली, तर कसबा पेठ मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा होती, मात्र हेमंत रासने (Hemant Rasane) यांना दिलीये. यावरूनच ब्राह्मण समाज नाराज झाल्याची चर्चा सुरू झालीये. त्याला कारण ठरलं पुण्यात (Pune) झळकलेले बॅनर्स.
ADVERTISEMENT
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रम कसबा पेठ व चिंचवड मतदारसंघात निवडणूक होत आहे. या जागांवर भाजपकडून कुणाला संधी दिली जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. दोन्ही जागांवर कुटुंबातीलच उमेदवार दिले जातील, असंही म्हटलं गेलं.
भाजपने चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, मात्र कसबा पेठ मधून भाजपनं मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. कसबा पेठ मधून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्यानं नाराजी समोर आलीये.
Balasaheb Thorat यांनी मौन सोडलं! तांबेंचं अभिनंदन करत म्हणाले, ‘जे झालं ते…’
रासने यांना तिकीट दिल्यानंतर मुक्ता टिळक यांचे पती शैलश टिळक यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता कसबा पेठ मतदारसंघात काही बॅनर्स झळकले आहेत. ब्राह्मण समाजावर अन्याय झाल्याचे हे बॅनर्स असून, यामुळे भाजपला ब्राह्मण समुदायातील मतांचा फटका बसू शक्यतो अशी चर्चा सुरू झालीये.
Kasba Peth bypoll : बॅनर्सवर काय लिहिलंय?
बॅनरवर लिहिलेलं आहे की, “कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?”
कसब्यात रात्रीच्या वेळी जवळपास 25 ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आले आहे. या बॅनरच्या खाली कसब्यातील एक जागरूक मतदार असंही लिहिलेलं आहे. पुण्यात अचानक हे बॅनर्स झळकल्यामुळे हे कुणी लावले? असा प्रश्नही आता चर्चेत आला आहे.
महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनीही याबद्दल ब्राम्हण समाजावर अन्याय झाल्याचं मत व्यक्त केलं. त्यामुळे रासने यांना दिलेल्या उमेदवारीमुळे ब्राह्मण समाजातील नाराजी दूर करण्याचं आव्हान भाजपसमोर निर्माण झाल्याचं सध्यातरी दिसत आहे.
कुलकर्णी, टिळक आणि बापट…
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदारसंघातून लढले आणि आमदार झाले. या मतदारसंघातून मेधा कुलकर्णी या आमदार होत्या. मात्र, त्यांना मतदारसंघ सोडावा लागला. मतदारसंघ सोडताना आपल्याला विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं, असंही मेधा कुलकर्णी नंतर म्हणाल्या होत्या.
Bypoll : प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना मेसेज, ‘मविआ’चं काय होणार?
मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली नाहीये. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचीही प्रकृती सध्या नीट नाहीये. त्यामुळे 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे गिरीश बापटांच्या ऐवजी कुणाला उमेदवारी मिळणार हेही महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT