Kasba Peth Bypoll : रुपाली ठोंबरेंचा पत्ता कट? कसब्यातून ‘ही’ पाच नावं दिल्लीत!

मुंबई तक

22 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:12 AM)

Kasba Peth Bypoll 2023 : पुणे : पक्षाने आदेश दिला तर मी कसबा पेठ मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार. 2019 मध्ये मुक्ताताई टिळक आहेत म्हणून मनसेने माझं तिकीट कापलं होतं. त्यावेळी मी तडजोड केली, आता या पोटनिवडणुकीत तिकिट दिल्यास जनतेचा कौल मी स्वीकारेल, असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त […]

Mumbaitak
follow google news

Kasba Peth Bypoll 2023 :

हे वाचलं का?

पुणे : पक्षाने आदेश दिला तर मी कसबा पेठ मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार. 2019 मध्ये मुक्ताताई टिळक आहेत म्हणून मनसेने माझं तिकीट कापलं होतं. त्यावेळी मी तडजोड केली, आता या पोटनिवडणुकीत तिकिट दिल्यास जनतेचा कौल मी स्वीकारेल, असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता त्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती आहे. (Kasba Peth Bypoll 2023 instead of rupali patil thombre- 5-congress-candidates-in-discussion)

कसबा पेठ काँग्रेसची परंपरागत जागा असून महाविकास आघाडीमार्फत या जागेवरुन काँग्रेसचं निवडणूक लढविणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर भोर-वेल्हाचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता इथून काँग्रेसच उमेदवार देणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे.

काँग्रेसमधून ही पाच नावं चर्चेत :

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, बाळासाहेब दाभेकर, संगीता तिवारी, कमल व्यवहारे, रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. तसंच या उमेदवारांनी नाना पटोले यांनी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या पाचही उमेदवारांची नावं दिल्लीला पाठविण्यात येणार असून लवकरच अंतिम नावावर शिक्कामोर्तब होईल असं सांगण्यात येत आहे.

‘कसबा पेठ’ मधून भाजपची ही नाव चर्चेत :

दरम्यान, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमधूनही काही नावं पुढं येत आहेत. यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हे इच्छुक असल्याची माहिती आहे. याशिवाय कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे यांचीही नाव चर्चेत आहेत.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे अनुक्रमे चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दोन्ही जागांवर बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

7 फेब्रुवारीला मतदान, 2 मार्च रोजी निकाल :

कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तर 7 फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. 8 फेब्रुवारी अर्जांची छाननी आणि 10 फेब्रुवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. दोन्ही मतदारसंघात 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 2 मार्च रोजी निकाल घोषित होणार आहे.

    follow whatsapp